ETV Bharat / state

लसीकरणासाठी राज्याला स्वतंत्र अ‍ॅप तयार करू द्या - नवाब मलिक - Minister of Minorities

सध्या कोविन अ‍ॅपवर रजिस्टर करून लस दिली जात आहे. परंतु हे अ‍ॅप वारंवार डाऊन होत आहे. त्यामुळे रजिस्टर केलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय लोकांना रजिस्टर करायला अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारला हे अ‍ॅप तयार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

Nawab Malik, National Spokesperson of the Nationalist Congress Party
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक
author img

By

Published : May 14, 2021, 8:52 AM IST

मुंबई - केंद्र सरकारला वाटत असेल की, आम्ही लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधानांचा फोटो हटवू पण आम्ही आश्वासन देतो की, प्रमाणपत्रावरील फोटो तसाच राहील. आपण आम्हाला स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

प्रतिक्रिया - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

अ‍ॅप तयार करण्यास परवानगी द्या -

सध्या कोविन अ‍ॅपवर रजिस्टर करून लस दिली जात आहे. परंतु हे अ‍ॅप वारंवार डाऊन होत आहे. त्यामुळे रजिस्टर केलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय लोकांना रजिस्टर करायला अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारला हे अ‍ॅप तयार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. केंद्र सरकारने ही परवानगी दिली तर या अ‍ॅप आणि इतर माध्यमातून लोकांच्या नोंदी घेऊन लस देण्यात सुलभता येईल. परंतु केंद्र सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा - नाशिककरांची चिंता वाढली, येवल्यात 4 तर लासलगावात 6 म्यूकरमायकोसिसचे रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.