ETV Bharat / state

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर 'प्लास्टिक द्या, मास्क घ्या' उपक्रम सुरू

काल 'वर्ल्ड रिसायकलिंग डे' साजरा झाला. यानिमित्त मुंबईतील रेल्वे स्थानकांवर 'प्लास्टिक द्या, मास्क घ्या' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Mumbai Railway Station Mask News
मुंबई रेल्वे स्टेशन मास्क न्यूज
author img

By

Published : Mar 19, 2021, 10:18 AM IST

मुंबई - 'वर्ल्ड रिसायकलिंग डे'च्या दिनानिमित्त प्लास्टिकचा संग्रह आणि पुनर्वापर करण्याबाबत जनजागृती केली जात आहे. यातूनच 'प्लास्टिक द्या, मास्क घ्या' हा अभिनव उपक्रम मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरू आहे. या उपक्रमातून पर्यावरण रक्षणासाठी आणि प्लास्टिकवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहे.

'प्लास्टिक द्या, मास्क घ्या' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे
एक महिना चालणार उपक्रम - संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, भारत सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका, हिंदुस्तान युनिलिव्हर्स आणि स्त्री मुक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आपली संसाधने टिकवून ठेवण्यात आणि पुनर्वापराचे महत्त्व 'वर्ल्ड रिसायकलिंग डे' अधोरखी करतो. वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाच्या संकटाला तोंड देण्यासाठी मध्य रेल्वेने या प्रकल्पासाठी भागीदारीसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर रेल्वे स्थानकावर प्लास्टिक कचरा संकलन केंद्र स्थापित केले आहेत. असे मिळणार मास्क - सर्व प्रकारचा प्लॅस्टिक कचरा जसे कीपॅड, बॉटल, पॉलिथिन, पिशव्या इत्यादी साहित्य जमा करून या संकलन केंद्रावर दिल्यास कापडी मास्क मिळणार आहे. यासाठी विनिमय दर ठेवण्यात आलेले आहेत. प्रति मास्कसाठी 10 प्लास्टिक बॉटल, 1 ते 2 किलो वजन वाहण्याची क्षमता असलेल्या 15 प्लास्टिक पिशव्या, 100 ग्रॅम वजन पेलू शकणारे खाद्यपदार्थांची 20 पाकिटे, दात घासण्याचे 20 ब्रश किंब स्ट्रॉ देता येणार आहे. मध्य रेल्वेमार्गावरील सीएसएमटी आणि दादर स्थानकावर हा उपक्रम सुरू आहे. दादर येथून येथे एकूण 106 नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. तर, त्यांना 158 मास्क देण्यात आले आहेत. या उपक्रमातून प्लास्टिक कचरा आणि कोरोना दोघांशीही लढता येणार आहे, असे दादर येथील समन्वयक मेहबूब शेख यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न - कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेला थोपवण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या वर्षीची 'ग्लोबल रिसायकलिंग डे'ची थीम 'रिसायकलिंग हिरोज' आहे. त्यामुळे प्लास्टिक कचरा गोळा करण्याचा आणि पुनर्वापर करण्याचा महत्त्वाबद्दल प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये जनजागृतीचा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वितरण करण्यात येत असल्याची माहिती स्त्री मुक्ती संघटनेच्या सदस्यांनी दिली.

हेही वाचा - उपराजधानीत कोरोनाचा कहर; नागपुरात 3 हजार 796, तर पूर्व विदर्भात 4 हजार 501 बाधित रूग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.