ETV Bharat / state

Girls Missing : धक्कादायक! महाराष्ट्रातून दररोज 70 तरुणी बेपत्ता; नॅशनल क्राइम ब्युरोची माहिती - Rupali Chakankar

महाराष्ट्रातून गेल्या 3 महिन्यांत तब्बल 5 हजार 610 तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. तसेच गुजरातमधून गेल्या 5 वर्षांत 40 हजार महिला आणि मुली गायब झाल्या आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Missing
Missing
author img

By

Published : May 9, 2023, 9:22 PM IST

Updated : May 11, 2023, 11:04 AM IST

घरातील भांडणामुळे जास्तीत जास्त मुली घर सोडतात- शकिल शेख

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या संपादकीय मधून गुजरात आणि महाराष्ट्रातून बेपत्ता होणाऱ्या मुलींबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सामनाच्या संपादकीयमध्ये लिहिले आहे की, 'गेल्या 5 वर्षांत गुजरातमधून 40 हजार महिला आणि मुली गायब झाल्या आहेत. हा आरोप विरोधकांनी केलेला नसून नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातूनही मुली बेपत्ता : जगाच्या पटलावर गुजरातसारखे दुसरे राज्य नाही, असे सामनाच्या संपादकीयमध्ये लिहिले आहे. गुजरात हे देशाच्या विकासाचे एकमेव मॉडेल असल्याचा अपप्रचार केला जातो. मात्र या एका अहवालाने गुजरातचा पर्दाफाश केला आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यपद्धतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे, असे 'सामना'त म्हटले आहे. एकीकडे 'द केरला स्टोरी' या चित्रपटावरून देशातील वातावरण तापले असताना आता महाराष्ट्र राज्यातूनही गेल्या 3 महिन्यांत तब्बल 5 हजार 610 तरुणी बेपत्ता झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे हा आकडा वाढताच असून मार्चमध्ये सर्वाधिक 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. एकूणच राज्यातून दिवसाला सरासरी तब्बल 70 मुली बेपत्ता होत आहेत.

Girls Missing
वाचा आकडेवारी

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचे ट्विट : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी एक ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातून 1 हजार 600 मुली बेपत्ता झाल्या, तर फेब्रुवारी महिन्यात 1 हजार 810 मुली बेपत्ता झाल्या. तसेच मार्चमध्ये 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे.

  • फार मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस महाराष्ट्रातून बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढते आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे.१/२@CMOMaharashtra @maharashtra_hmo @MPLodha @DGPMaharashtra pic.twitter.com/OmSUzrwjIZ

    — Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 8, 2023 om/widgets.js" charset="utf-8">" class="align-text-top noRightClick twitterSection" data=" om/widgets.js" charset="utf-8">"> om/widgets.js" charset="utf-8">

कशामुळे मुली होतात बेपत्ता- इतक्या मोठ्या प्रमाणावर मुली गायब होण्याचे प्रमाण असून त्या मागचे काही कारणे आपण जाणून घेऊया. मुली, महिला बेपत्ता होण्यामागे पतीसोबत भांडण करून घर सोडून जाणे, प्रेम प्रकरणातून पळून जाणे, रागाच्या भरात घरातून निघून जाणे ही काही कारणे प्रामुख्याने समोर येत आहेत. यामध्ये ५० टक्के महिला परत आल्याचे पोलिसांचे म्‍हणणे आहे. मात्र, शरीरविक्रयाशी (सेक्स स्लेव्ह) संबंधित मानवी तस्करी, शोषणाच्‍या घटनांचे धोके व्‍यक्‍त होताना दिसतात. अशा घटनांचा मागोवा घेण्‍याची गरज आता व्‍यक्‍त होऊ लागली आहे.

लहान-मोठ्या कारणांवरून वाद टोकाला जातात- अनेक कुटुंबांमध्ये मुलांकडून अनपेक्षित इच्छा-अपेक्षा, वैचारिक मतभेद आणि इतर कारणांवरून लहान-मोठे वाद होत असतात. मात्र, अशा परिस्थितीत संतापाच्या भरात कुटुंबाला सोडून जाण्याच्या घटना वाढत आहेत. अनेक लहान-मोठ्या कारणांवरून पती-पत्‍नीतील वाद टोकाला जातात. टोकाची भूमिका घेतली जाते आणि सततच्‍या वादाला कंटाळून महिलांनी घर सोडल्‍याचे प्रकार घडतात.

महिलांना शोधणे जाते कठीण- नवऱ्याच्‍या त्रासाला कंटाळून अनेक महिला घरून निघून जातात. तरुण-तरुणींच्‍या प्रेमात कुटुंबीयांचा अडसर होत असेल तर थेट पळून जाण्‍याचा मार्ग अवलंबला जातो. स्‍वप्‍न दाखवून, आश्‍वासने देऊन तरुणी किंवा महिलांना पळवून नेण्‍याच्‍या घटना वाढल्‍या आहेत. फूस लावून पळवून नेण्‍याचे प्रमाण तरूण मुलींमध्‍ये सर्वात अधिक आहे. हरविल्‍याची तक्रार दिल्‍यानंतर पोलिसांकडून संबंधित महिला, मुलींचा शोध घेतला जातो. मात्र, कुठलेही तपासात दुवे आढळून न आल्‍यास महिलेचा पत्‍ता हुडकून काढणे कठीण होते.

महिलांचा मानवी तस्करीसाठी होतो वापर- अनेक घटनांमध्‍ये १८ वर्षांवरील मुली, महिला स्‍वत :च्या मर्जीने घर सोडून निघून गेल्‍याचे प्रकार उघडकीस येतात. काही घटनांमध्‍ये त्‍या घरी परतण्‍यास नकारही देतात. मोबाईल लोकेशन किंवा इतर तांत्रिक तपासाच्‍या आधारे महिलांचा शोध घेणे अलीकडे सोपे झाले असले तरी कुठलेही धागेदोरे न आढळल्‍यास पोलिसांसाठी ते आव्‍हान ठरत असते. अनेक महिलांचा मानवी तस्करीसाठी वापर केला जात असल्‍याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा :

  1. Kirit Somaiya on NCP : राष्ट्रवादी 'लव जिहाद'चे समर्थन करणार का? किरीट सोमय्या यांचा सवाल
  2. Womens Missing From Maharashtra : मार्चमध्ये राज्यातील तब्बल 2200 महिला बेपत्ता, महिला आयोगाच्या अध्यक्षांची तातडीने कारवाई करण्याची मागणी
  3. ED Raid On Anil Jayasinghani House : बुकी अनिल जयसिंघानीच्या घरी गुजरात 'ईडी'चा छाप
etv play button

Last Updated : May 11, 2023, 11:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.