ETV Bharat / state

सीबीएसईच्या परिक्षेत पहिल्या ६ स्थानावर मुलींचीच बाजी, निकालात ०.३९ टक्क्यांची वाढ - student

सीबीएसईने यंदा बारावीचा निकाल केवळ २८  दिवसात जाहीर केला आहे. देशातील पहिल्या २३ टॉपरमध्ये १५ मुलींचा समावेश  आहे. तर पहिल्या सहाही स्थानावर राहून मुलींनी विक्रम केला आहे. सर्वाधिक निकाल हा केंद्रीय विद्यालयांचा आहे.  तर खाजगी शाळांच्या निकालात यंदाही घसरण झाल्याचे चित्र या निकालातून समोर आले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : May 2, 2019, 3:17 PM IST

मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) मार्च - एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. देशभरातून यात ८३.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या परिक्षेत सुद्धा मुलींनीच अव्वल क्रमांक पटकावला आहे. खासगी शाळांची घसरण झालेली यावेळी पहायला मिळाली.

देशातून पहिल्या सहा आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचाच समावेश आहे. दिल्लीतील हंसिका शुक्ला आणि मुझफ्फरपुरची करिष्मा अरोरा या दोघी अव्वल आल्या आहेत. त्यांना ५०० पैकी ४९९ गुण मिळाले. देशातील पहिल्या २३ अव्वल विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही.

सीबीएसईच्या निकालात मागील वर्षाच्या तुलनेत ०.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९८.२० टक्के लागला. त्या खालोखाल चेन्नईचा निकाल ९२.९३ टक्के लागला. सर्वात कमी निकाल दिल्ली विभागाचा ९१.८७ टक्के लागला. देशभरातून सीबीएसई परिक्षेला १२ लाख ५ हजार ४८४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १० लाख ५ हजार ४२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सीबीएसईच्या या निकालात दिव्यांगांमधून हरियाणाची लावण्या बालकृष्णन ही देशात टॉपर ठरली. त्याखालोखाल केरळची निमिमी वेद, निश्चय कोहली, श्रेयश शहा या तीन विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ४८५ गुण मिळवून दिव्यांगातून दुसरा क्रमांक पटकावला. दिव्यांगातून देशभरात ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणारे २२५ विद्यार्थी आहेत. ९५ ते ९९ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही ३६ इतकी आहे.

९४ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण
यावेळी देशभरात ९० टक्के आणि त्यातून अधिक गुण‍ मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढली आहे. यंदा देशभरात ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण हे ९४ हजार २९९ विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. ९५ ते ९९ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही १७ हजार ६९३ इतकी आहे.

खासगी शाळांची घसरण
सीबीएसईने यंदा बारावीचा निकाल केवळ २८ दिवसात जाहीर केला आहे. देशातील पहिल्या २३ टॉपरमध्ये १५ मुलींचा समावेश आहे. तर पहिल्या सहाही स्थानावर राहून मुलींनी विक्रम केला आहे. सर्वाधिक निकाल हा केंद्रीय विद्यालयांचा आहे. तर खाजगी शाळांच्या निकालात यंदाही घसरण झाल्याचे चित्र या निकालातून समोर आले आहे.

अशी आहे टक्केवारी

  • सरकारी अनुदानित : ८८.४९ टक्के
  • सरकारी शाळा : ८७.१७
  • खाजगी शाळा : ८२.५९
  • जवाहरलाल नवोदय विद्यालय : ९६.६२
  • केंद्रीय विद्यालय : ९८.५४
  • सीएसटीए(सेंट्रल तिबेटीयन अडमिनिस्ट्रेशन) : ९६.०४

Intro:सीबीएसईचा बारावीचा निकाला जाहीर, 83.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; खासगी शाळांच्या निकालाची यंदाही घसरणBody:सीबीएसईचा बारावीचा निकाला जाहीर, 83.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; खासगी शाळांच्या निकालाची यंदाही घसरण
मुंबई, ता. २ :
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या देशभरातून ८३.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाही या परीक्षेत मुलींनीच आपला दबदबा कायम ठेवला असून देशातील पहिल्या सहा टॉपरमध्ये मुलींचाच समावेश आहे. तर देशात दिल्लीतील हंसिका शुक्ला, मुझफ्फरपुरची करिष्मा अरोरा या दोघी टॉपर ठरल्या आहेत. या दोघींनीही 500 पैकी 499 गुण मिळवले आहेत. तर दुसरीकडे सरकारी, केंद्रीय विद्यालयांचा निकाल हा सर्वाधिक लागला असताना लाखो रुपयांचे शुल्क आकारणाऱ्या खाजगी शाळांच्या निकालात यंदाही घसरण झाल्याचे समोर आले आहे.
देशातील पहिल्या 23 टॉपरमध्ये राज्यातील एकही विद्यार्थ्यांचा समावेश नसला तरी केंद्रीय विद्यालयातील अनेक विद्यार्थी देशातील इतर शाळांच्या तुलनेत टॉपर ठरले आहेत. सीबीएसईच्या मागील वर्षाच्या तुलनेत 0.39 ने वाढ झाली असून यंदा त्रिवेंद्रम विभागाचा सर्वाधिक लागला आहे. या विभागात निकाल यंदा 98.20 टक्के लागला आहे. त्या खालोखाल चेन्नई विभागाचा लागला असून या विभागात 92.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर त्यानंतर सर्वात कमी निकाल हा दिल्ली विभागाचा असून यात 91.87 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
देशभरात सीबीएसईच्या परीक्षेला 12 लाख 5 हजार 484 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 10 लाख 5 झर 427 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल 83.30 टक्के इतका आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 0.39 टक्के इतकी वाढ झाली आहे.
सीबीएसईच्या या निकालात दिव्यांगांमधून हरियानाची लावण्या बालकृष्णन ही देशात टॉपर ठरली असून त्याखालोखाल केरळाची निमिमी वेद, निश्चय कोहली, श्रेयश शहा या तीन विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ४८५ गुण मिळवून देशात दिव्यांगातून दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. दिव्यांगातून देशभरात ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण हे २२५ विद्यार्थ्यांनी मिळवले असून ९५ ते ९९ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही ३६ इतकी आहे.
--
९४ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण
यावेळी देशभरात ९० टक्के आणि त्यातून अधिक गुण‍ मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढली आहे. यंदा देशभरात ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण हे ९४ हजार २९९ विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. ९५ ते ९९ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही १७ हजार ६९३ इतकी आहे.
--
खासगी शाळांची घसरण
सीबीएसईने यंदा बारावीचा निकाल केवळ 28 दिवसात जाहीर केला आहे. देशातील पहिल्या 23 टॉपरमध्ये 15 मुलींचा समावेश तर पहिल्या सहाही मुलीनेच केला विक्रम केला आहे. सर्वाधिक निकाल हा केंद्रीय विद्यालयांचा असून तर खाजगी शाळांच्या निकालात यंदाही झाली घसरण झाल्याचे चित्र या निकालातून समोर आले आहे.
अशी आहे टक्केवारी...
सरकारी अनुदानित : 88.49 टक्के
सरकारी शाळा : 87.17
खाजगी शाळा : 82.59
जवाहरलाल नवोदय विद्यालय : 96.62
केंद्रीय विद्यालय : 98.54
सीएसटीए(सेंट्रल तिबेटीयन अडमिनिस्ट्रेशन) : 96.06
---

Conclusion:सीबीएसईचा बारावीचा निकाला जाहीर, 83.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; खासगी शाळांच्या निकालाची यंदाही घसरण
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.