मुंबई : माहीमचा अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन करतो. लव जिहाद नव्हे, तर लँड जिहाद मोठी समस्या बनली आहे. हिंदूंची लोकसंख्या कमी करण्याचे मोठे षडयंत्र आहे. माहीम, सांगली याठिकाणीची उदाहरण आहेत. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्हाला लँड जिहादची प्रकरण दिसतील. चांदीवलीमध्ये मुंबई महापालिकेच्या ग्रीन झोनमध्ये चार मजली मदरसा बांधण्यात येतो आहे. चेंबूरमध्ये नाल्यावर अतिक्रमण करून त्यावर मज्जिद उभी राहत आहे. त्या विरोधात आम्ही मुंबई महापालिकडे तक्रार केली आहे. माहीम सांगली नव्हे, तर महाराष्ट्रात हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करण्याच्या षड्यंत्र आखले गेल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
मुंबई हिंदू समाज 65 टक्के : एखाद्या ठिकाणी अतिक्रमण करायचे आणि जिथे शाकाहारी लोक राहतात तिथे जाऊन बकरे कापायचे. वास सुरू झाला की जैन समाज, गुजराथी समाजाची लोक तेथील घर विकून त्यांची वस्ती बनवतात, असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला. मुंबई हिंदू समाज 65 टक्के आणि मुस्लिम समाज 10 टक्क्यांवरून 20 टक्के वर आल्याचा दावा नितेश राणे यांनी केला. याचे प्रमुख कारण लँड जिहाद असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले. माहीम नव्हेच तर मुंबईच्या प्रत्येक वॉर्ड मध्ये अशा प्रकारची बांधकामे उभी राहत आहेत. राज्य सरकारने ज्या पद्धतीने पाऊल टाकले आहे तिथे मुंबई महापालिकेच्या भागात जेवढी अतिक्रमण आहेत, त्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार राणे यांनी केली.
महाराष्ट्र बाकी है - मंत्री मंगलप्रभात लोढा : माहीम येथील दर्ग्या संदर्भात राज ठाकरे यांनी बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्याबद्दल ठाकरे आणि कारवाई करणाऱ्या राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार. केवळ माहीम नव्हे मानखुर्द, गोवंडी भागात आहेत. माहीम झांकी आहे, महाराष्ट्र बाकी आहे, असे सूचक विधान मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. लव्ह जिहादवर बोलताना, लव्ह जिहाद संदर्भात विधान भवनात जी आकडेवारी दिली त्यावर मी ठाम आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने लव्ह जिहाद वाढला आहे. ते थांबवण्याची गरज आहे. परंतु विरोधक आपला मतदार टिकवण्यासाठी सगळ प्रयत्न करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र त्यांना उत्तर देईल : आमची काही हरकत नाही. लोक त्यांना उत्तर देण्यासाठी तयार आहेत. लव्ह जिहाद त्यांच्यासाठी गौरवाची बाब असेल, परंतु आमच्यासाठी शरमेची गोष्ट आहे. हे महाराष्ट्र असून ते थांबवायला हवे. महाराष्ट्रात रोहिंग आणि बांगलादेशी नागरिकांना खुश करण्यासाठी अशी विधान होत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र त्यांना उत्तर देईल, असा इशारा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला.
हेही वाचा : Abu Azmi Criticize on Government : हिंदू व्होट बॅंकेसाठीच माहीमच्या मजारीवर कारवाई : अबू आझमी यांची टीका