ETV Bharat / state

फुटबॉलचे अच्छे दिन लवकरच येणार! जर्मनीच्या या दिग्गज फुटबॉलपटूनं भारतात सुरू केली अकादमी - फुटबॉल अकादमी

Oliver Kahn : क्रिकेटवेड्या भारतात अजूनही फुटबॉलचा पाहिजे तितका विकास झालेला नाही. जगातील सर्वात लोकप्रिय खेळात भारत अद्यापही खूप मागे आहे. मात्र हे चित्र लवकरच बदलेल, कारण जर्मनीच्या एका दिग्गज फुटबॉलपटूनं यासाठी पुढाकार घेतलाय. (Oliver Kahn football academy).

German footballer Oliver Kahn
German footballer Oliver Kahn
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 8:56 PM IST

Updated : Nov 24, 2023, 9:52 PM IST

पाहा व्हिडिओ

मुंबई Oliver Kahn : जर्मनीचे दिग्गज फुटबॉलपटू ऑलिव्हर कान यांनी भारतातील फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी फुटबॉल अकादमी सुरू केली आहे. या निमित्तानं ते शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) मुंबईतील एका शाळेत आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी, "भारत लवकरच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत खेळेलं", असा विश्वास व्यक्त केला. "भारतातील युवा खेळाडूंमध्ये फुटबॉल प्रति भरपूर आत्मीयता आणि प्रेम आहे. त्या प्रेमाला योग्य दिशा आणि प्रशिक्षण दिलं तर भारत फुटबॉलमध्ये नवीन उंची गाठेल", असं ते म्हणाले.

अकादमीच्या माध्यमातून फुटबॉलचे धडे : क्रिकेटवेडा भारत अजूनही फुटबॉलच्या बाबतीत खूप मागे आहे. भारतात फुटबॉलचे करोडो चाहते आहेत. मात्र खेळाडूंना योग्य दिशा आणि प्रशिक्षण मिळत नसल्यानं ते भरकटतात. फिफा वर्ल्डकप आला की भारतात फुटबॉल बद्दल बोललं जातं, त्याचा विचार केला जातो. मात्र एकदा वर्ल्डकप संपला, की हा विचार फक्त विचारच राहतो. फिफा वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्याचं भारताचं स्वप्न आहे. आता हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ऑलिव्हर कान यांनी कंबर कसली आहे.

भारतात फुटबॉलपटू घडवण्यात मदत : ऑलिव्हर कान यांनी भारतात फुटबॉलपटू घडवण्यासाठी अकादमी सुरू केलीये. या अकादमीच्या माध्यमातून भारतीय फुटबॉलपटूंना खेळाचे विशेष धडे दिले जातील. यामुळे भारतीय फुटबॉल प्रगतीपथावर नेण्यास मोठी मदत होणार आहे. याद्वारे केवल फुटबॉलपटूच नाही, तर एकूण अ‍ॅथ्लीट घडवण्यामध्ये देखील फार मोठी मदत होईल. भविष्यात ही अकादमी संपूर्ण भारतात सुरू करण्याचा ऑलिव्हर कान यांचा मानस आहे.

भारतीय फुटबॉलमध्ये मोठी क्षमता : भारतात फुटबॉल अकादमी सुरू करण्याबाबत बोलताना ऑलिव्हर कान म्हणाले की, भारतात फुटबॉलमध्ये जबरदस्त कामगिरी करण्याची क्षमता आहे. युवा वर्ग यासाठी फार उत्साही दिसतो. यासाठी गरज आहे ती फक्त फुटबॉलपटूंना योग्य प्रशिक्षण, शिस्तबद्ध अभ्यासक्रम आणि जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याची. फुटबॉलमध्ये भारतानं नावलौकिक कमवावा यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत. भारत लवकरच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सहभागी होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भारतातील फुटबॉलच्या आठवणी : यावेळी बोलताना ऑलिव्हर यांनी भारतातील त्यांच्या फुटबॉलच्या आठवणींना उजाळा दिला. कान म्हणाले की, "२००८ मध्ये मी माझ्या आयुष्याची शेवटची मॅच कोलकाता येथे खेळलो. ती माझ्या आयुष्यातील फार मोठी घटना होती. मला तुमच्यामध्ये भविष्य दिसतं. माझा प्रयत्न नेहमी माझ्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त मेहनत घेण्याचा असायचा. मला माझे प्रशिक्षक सांगायचे तू चांगला गोलकीपर आहेस, परंतु उत्कृष्ट नाहीस. नंतर मी माझ्या आयुष्यात बदल घडवला". नेहमी चांगलं होण्यापेक्षा उत्कृष्ट होण्याचा प्रयत्न करायला हवा, असा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा :

  1. कतारविरुद्ध पराभूत होऊनही भारत फिफा विश्वचषकासाठी पात्र होऊ शकतो; कसं ते जाणून घ्या

Last Updated : Nov 24, 2023, 9:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.