मुंबई - पारंपरिक गौरी गीते गात आज (रविवार) मुंबईत गौरीचे आगमन झाले. सुहासिनींनी सुंदर वस्त्रालंकार परिधान करून मोठ्या थाटामाटाने गौराईचे स्वागत केले. गणपतीच्या तिसऱ्या दिवशी गौराई आणि चौथ्या दिवशी शंकरोबाचे आगमन होते. त्यानुसार आज गौराईचे आगमन झाले. घरातल्या सुवासिनींनी वाजत गाजत दारात आलेल्या गौराईची दृष्ट काढून तिला घरात आणली. यानंतर गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साध्या पद्धतीने गौरीचे आगमन करण्यात आले.
उत्साहात गौरीचे आगमन -
गणरायाच्या आगमनानंतर वेध लागतात ते गौरीच्या आगमनाचे, आज ज्येष्ठा कनिष्ठा गौरीच मोठ्या थाटात घरोघरी आगमन झाले. महाराष्ट्रातील सर्वच विभागातील मराठी जनता वास्त्यव्यास आहे. या गौरीला विदर्भ, मराठवाडा, खान्देशात महालक्ष्मी म्हणतात तर पश्चिम महाराष्ट्र कोकणात गौरी म्हणतात. ह्या गौरी अगदी 5 ते 10 इंचापासून ते दोन ते तीन फुटापर्यंत असतात. काही ठिकाणी पुतळे असतात तर काही ठिकाणी अगदी महिला शालू, पैठणी नेसून गौरीला सजवण्यात येते. दागदागिने घालून या महालक्ष्मीचा शृंगार केलेला असतो. आज मराठी पंचांगानुसार भाद्रपद शुद्ध अनुराधा नक्षत्रावर षष्ठीला आगमन आवाहन झाले. सप्तमीला पूजन आणि अष्टमीला विसर्जन होणार आहे. या दिवशी घरातील महिला मुले विशेष परिश्रम करून आरास करतात.
हेही वाचा - Gauri Festival : गौरींचे उत्साहात आगमन; 'अशी' आहे कोकणातील गौरी आगमनाची परंपरा