ETV Bharat / state

Mangal Prabhat Lodha : मुंबई गेटवे ऑफ इंडीया, गिरगाव चौपाटी उजळणार, पर्यटकांच्या सोयीसाठी मुंबईत हो हो बस सेवेचा शुभारंभ

देशाची आर्थिक राजधानी मुंबई असून पर्यटकांनी यावे यासाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडीया, गिरगाव चौपाटी विद्युत रोषणाईने उजळणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी मुंबईत हो हो बस सेवेचाही शुभारंभ आज करण्यात आला.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jan 20, 2023, 10:58 PM IST

गिरगाव चौपाटी उजळणार

मुंबई - पर्यावरणपुरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हो-हो बसची सुविधा सुरु केली आहे. दुमजली असलेल्या या एका बसचे लोकार्पण पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. एमटीडीसी, एचआर कॉलेज यांच्या सहकार्याने व्हिडिओ टेप, छायाचित्रे, महामंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन, अंजिठा लेणी आकाश निरीक्षण उपक्रम, युवा पर्यटन संघ उपक्रम सुरू करण्यात आला. युवा पर्यटन संघाचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे लोढांनी सांगितले.

हो हो बसची सुविधा - मुंबई हे देश विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मुंबईत या पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हो हो बसची सुविधा सुरु करण्यात आली आहे. आगामी कालावधीत ११ हो हो बस राज्यभरात सुरू करण्यात येणार आहेत. आज एका बसचे लोकार्पण मंत्री लोढा यांनी केले.

आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा - या बस बऱ्याच वर्षांपासून नादुरुस्त स्थितीत होत्या. त्यांना दुरुस्त करुन पर्यटकांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. या बसच्या आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. बुक माय शो या ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनीची मदत घेतली जाणार आहे. या हो हो बसचे आरक्षण दर कमी असेल, अशी माहिती .लोढा यांनी यावेळी दिली. यादरम्यान हो हो बसने .लोढा यांनी मंत्रालय ते मरीन ड्राईव्ह असा सफर केला. उद्घाटन कार्यक्रमाला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल,एच.आर.कॉलेजचे पर्यटन विषयक शिक्षण घेणारे विद्यार्थ्या यावेळी उपस्थित होते.

युवा पर्यटन संघाची स्थापना - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि एच आर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज युवा पर्यटन संघ स्थापन करण्यात आला आहे.या उपक्रमात पर्यटन विषयक शिक्षण घेणारे २० विद्यार्थी आज सहभागी झाले होते.पर्यटनातील विविध संधी आणि पर्यटन स्थळांची या पर्यटन विषयक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संलग्न झाल्यामुळे फायदा होईल असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

मुंबई झगमगणार - मुंबईतील गेट ऑफ इंडिया आणि गिरगाव चौपाटी या ठिकाणी लेझर शो सुरु करण्यात येणार आहेत तसेच विद्युत रोषणाई केली जाणार आहे. पर्यटकांना आस्वाद घेता यावा यासाठी मुंबईतील किल्ल्यांची डागडुजी करून ते पर्यटनासाठी खुले केले जाणार असल्याची माहिती लोढा यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - Chhagan Bhujbal Warrent : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी वॉरंट काढण्याची तंबी; काही मिनिटातच छगन भुजबळ कोर्टात हजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.