मुंबई - संपूर्ण भारताला अभिमान वाटावा असे चंद्रयान 2 ने नुकतेच यशस्वी उड्डाण केले. येत्या काही दिवसात चंद्रयान 2 हे यशस्वी मंगळवार उतरणार आहे. या यशस्वी प्रवासाचा उलगडा सांताक्रूझ येथे राहणाऱ्या मकवाना कुटुंबियांनी चंद्रयान 2 ची प्रतिकृती आपल्या बाप्पाच्या देखाव्यातून साकारुन केला आहे.
हेही वाचा-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सिद्धीविनायक चरणी; भाजप नेत्यांसोबत गुप्त चर्चा
यंदा मकवाना कुटुंबियांचे गणेशोत्सवाचे 28 वे वर्ष आहे. व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर असलेले दीपक मकवाना हे भारतात होणारे नवीन यशस्वी प्रकल्प दरवर्षी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून साकारतात. त्यांनी शाडूची इकोफ्रेंडली गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. हा देखावा इकोफ्रेंडली असून तो उभारण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागल्याचे मकवाना यांनी सांगितले.