ETV Bharat / state

Ganeshotsav २०२३ : वर्षावर 'करण-अर्जुन'; मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन - salman shahrukh at cm house mumbai

Ganeshotsav २०२३ : बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान अणि सलमान खान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणरायाच्या दर्शनाला एकत्र आले होते. ही 'करण-अर्जुन'ची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसल्यानं चर्चांना उधाण आलंय.

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 7:56 AM IST

मुंबई : Ganeshotsav २०२३ : बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांनी रविवारी (24 सप्टेंबर) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'वर्षा' बंगल्यावर जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन (Salman Shahrukh at Varsha) घेतलंय. शाहरुखसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी तर सलमानसोबत त्याची बहीण अर्पिता व मेव्हुणा आयुष शर्माही उपस्थित होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही खानचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांसोबत शाहरुख आणि सलमाननं फोटोही काढले.

करण-अर्जुनची जोडी पुन्हा एकत्र : शाहरुख खान सहसा कोणत्याही राजकीय नेत्यांच्या घरी जाताना दिसत नाही. राजकारणापासून शाहरुख नेहमी लांबच राहतो. मात्र, शाहरुख खान बऱ्याच काळानंतर एखाद्या राजकीय नेत्याच्या घरी गेल्याचं पाहायला मिळालं. शाहरुख खान राजकीय नेतेचं काय तर फिल्म इंडस्ट्रीमधील सहकाऱ्यांच्या देखील घरी जाताना जास्ती दिसत नाही. यावेळी शाहरुख खानबरोबर सलमान खान मुख्यमंत्र्यांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला एकत्र आले. ही करण-अर्जुनची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसल्यानं चर्चांना उधाण आलंय.

दिग्गज कलाकारांनी घेतलं मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन : यावेळी कल्याण -डोंबिवलीचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंनी शाहरुख-सलमानला श्रीगणेशाची मूर्ती भेट दिली. याप्रसंगी शिंदे कुटुंबियांनी शाहरुख-सलमान खानसोबत फोटोही काढले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शाहरुख खान, सलमान खान यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दोन्ही खानाच्या एथनिक लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी सलमाननं लाल कुर्ता घातला होता, तर शाहरुखनं निळ्या रंगाचा पठानी सूट परिधान केला होता. शाहरुख-सलमान व्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, आशा भोसले, बोनी कपूर आणि रश्मी देसाई यांच्यासह अन्य बॉलिवूड कलाकारांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीचं दर्शन घेतलंय.

हेही वाचा :

  1. Ganeshotsav 2023: परळचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग, पाहा व्हिडिओ
  2. Lalbaugcha Raja Darshan : दिग्गज सेलिब्रिटी 'लालबागच्या राजा'चरणी लीन; पाहा व्हिडिओ
  3. CM Eknath Shinde Ganapati Darshan : एकनाथ शिंदे यांनी उद्योगपती अभिनेत्यासह 'या' ठाकरे गटाच्या नेत्याच्या घरी घेतलं गणपती दर्शन, पहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.