ETV Bharat / state

Konkani Jakhadi Dance : गणेशोत्सव काळातील कोकणातील प्रसिद्ध 'जाखडी लोककला'; जाणून घ्या इतिहास

Konkani Jakhadi Dance : कोकणातला पारंपरिक 'जाखडी लोककला' प्रकार (Jakhadi Dance) प्रसिद्ध आहे. महिनाभर आधीच तालमी करून गणपतीत (Konkan Ganpati) हा नृत्यकला प्रकार घरोघरी खेळला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आनंदानं, उत्साहानं सगळेच याचा आनंद लुटतात. मात्र, या कोकणातील लोककलेचा इतिहास काय आहे? (Jakhadi Dance History) ही लोककला कधी सुरू झाली? याची माहिती जाणून घ्या...

Ganeshotsav २०२३
जाखडी लोककलेचे सादर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 9:29 AM IST

Updated : Sep 18, 2023, 11:12 AM IST

मुंबई : Konkani Jakhadi Dance : गणपती उत्सव अगदी एका दिवसावर येऊन ठेपलाय (Ganesh Chaturthi 2023). आता गणपती म्हटलं की, (Ganeshotsav 2023) कोकण आणि कोकण म्हटलं की गणपतीचा उत्साह (konkan Ganpati Festival) असं एक समीकरण झालंय. याच गणपती उत्सवाच्या काळात तुम्हाला कोकणातील घराघरातून जाखडी नृत्याचा (Konkan Jakhadi Dance) आवाज कानावर पडतो. याला कोकणात 'शक्ती तुरा' (Shakti Tura) असं देखील म्हटलं जातं. आज ही कला संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झाली आहे. याच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.

सहाव्या शतकापासून कला सादर : कोकणातील 'शक्ती तुरा' या लोककला (konkani lokkala Jakhadi) प्रकारातील शाहीर प्रफुल्ल पुजारी यांनी सांगितलं की, जाखडी नृत्याची कला वडिलोपार्जित आहे. आजही कोकणातील अनेक तरुण ही कला जोपासत आहेत. साधारण सहाव्या शतकापासून या लोककलेला इतिहास असल्याची माहिती मिळते. कवी नागेश यांनी कलगी म्हणजेच 'शक्ती' पंथाची स्थापना केली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले समकालीन कवी हरदास यांनी 'तुरा' या पंथाची स्थापना केली. या दोन शाहिरांनी कोकणवासियांचं मनोरंजनातून प्रबोधन करण्यासाठी सुरुवात केली.

'शक्ती' आणि 'तुरा' या दोन शब्दांचे नेमके अर्थ काय? : शक्ती म्हणजे पार्वतीचं रूप तर तुरा म्हणजे शंकराचं रूप मानलं जातं. यात शक्तीवाले पार्वतीचा महिमा आपल्या गाण्यांमधून मांडत असतात, तर तुरेवाले शंकराची थोरवी आपल्या गाण्यांमधून मांडत असतात. या गाण्यांमध्ये स्तवन, गण, गवळण आणि पद असा क्रम असतो. त्यामुळं कोकणात जेवढं गणपती सणाला (Konkan Ganpati) महत्त्व आहे, तितकंच कोकणात या 'शक्ती तुरा' लोककलेला महत्त्व आहे.

नृत्याचा कार्यक्रम गणपतीच्या सणातच सादर : शक्ती तुरा ही एक कोकणची लोककला आहे. ही लोककला आज प्रत्येक कोकणी माणसाच्या रक्तात भिनभिनली आहे. त्यामुळं ढोलकीची थाप पडली की, कोकणी माणसाच्या अंगात ही लोककला संचारते. आता हे नृत्य गणपती काळातच का सादर केले जाते? याची कोणतीही ठोस नोंद आढळत नाही. पण, शंकर आणि पार्वतीचा महिमा सांगणारी कला सादर करण्यासाठी गणपतीसारखा दुसरा योग्य सण नाही. त्यासाठीच पूर्वजांनी हा सण निवडला असावा, असं बोललं जातं.

21 व्या शतकात कला मागे पडत आहे? : साधारण सहाव्या शतकापासून सुरू झालेली ही कला आज 21 व्या शतकात देखील मोठ्या प्रमाणात मागं पडल्याचं दिसत आहे. झांज, ढोलकी आणि बासरी या पारंपरिक वाद्यांपासून सुरू झालेला या कलेचा प्रवास आज आधुनिक वाद्यांपर्यंत पोहोचलाय. आज शक्ती तुरा नृत्य सादर करताना डबल मिनिंग गाणी जास्त गायली जातात, असा आरोप देखील काही कोकणवासी करतात. त्यामुळं मनोरंजनातून प्रबोधन करण्यासाठी सुरू झालेल्या या लोककलेचा प्रवास काहीसा संथगतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळतं.

काळानुसार गाण्यांमध्ये झाले बदल : आजही या लोककलेमध्ये शाहीर मनोरंजनातून प्रबोधन होईल अशीच गाणी सादर करतात. काळानुसार गाण्यांमध्ये काही बदल झाले ही गोष्ट खरी असली तरी, सर्वच गाणी अशी आहेत असं नाही. अनेक गाण्यांमध्ये शंकर पार्वतीच्या आख्यायिकेसोबतच गणपतीचा महिमा, कोकणचं सौंदर्य हे देखील अनुभवता येईल. त्यामुळं यातून आपण नेमकं काय घ्यावं हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आणि निर्णय आहे, असं शाहीर प्रफुल्ल पुजारी सांगतात.

हेही वाचा -

  1. Ganeshotsav २०२३ : रायगडावरील दिमाखदार मेघडंबरीत विराजमान ‘लालबागचा राजा’; पाहा व्हिडिओ
  2. Gauri Ganpati २०२३ : गौराईच्या देखण्या मुखवट्यांनी सजली बाजारपेठ; यंदा दागिन्यांमध्ये 'बाईपण भारी'ची क्रेझ
  3. Ganesh festival 2023 dressing : गणेशोत्सवाला सर्वोत्तम आहे महाराष्ट्रीयन लूक; फॉलो करण्यासाठी या गोष्टी सोबत ठेवा

कोकणातील जाखडी लोककलेचा इतिहास

Last Updated : Sep 18, 2023, 11:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.