ETV Bharat / state

गणेश विसर्जन : पवई तलावात घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात - Ganesh immersion started in pawai lake

तर दुपारनंतर पवई विभागातील विसर्जनासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळ सध्या जागोजागी गणरायाची आरती करून विभागातून मिरवणूक काढत आहेत . आज (गुरुवारी) पावसाने उपनगरांमध्ये विश्रांती घेतल्यामुळे आपल्या लाडक्या गणरायाचं वाजत गाजत मोठ्या आनंदात विसर्जन होत आहे.

गणेश विसर्जन : पवई तलावात घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात
author img

By

Published : Sep 12, 2019, 1:32 PM IST

मुंबई - गेल्या १० दहा दिवस आपल्या गणरायाचा उत्सव जल्लोषात साजरा केल्यानंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्त तयार झाले आहेत. येथील पवई तलावाकडे गणेश भक्तांनी बाप्पाच्या विसर्जन करण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. सकाळपासून घरगुती गणपतीचे विसर्जन भक्तिमय वातावरणात होत आहे.

गणेश विसर्जन : पवई तलावात घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात

तर दुपारनंतर पवई विभागातील विसर्जनासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळ सध्या जागोजागी गणरायाची आरती करून विभागातून मिरवणूक काढत आहेत . आज (गुरुवारी) पावसाने उपनगरांमध्ये विश्रांती घेतल्यामुळे आपल्या लाडक्या गणरायाचं वाजत गाजत मोठ्या आनंदात विसर्जन होत आहे.

हेही वाचा - बाप्पा निघाले गावाला...'देव द्या, देवपण घ्या'; नाशिककरांचा स्तुत्य उपक्रम

सध्या पवई तलावावर सार्वजनिक मोठे गणपती विसर्जन करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. या ठिकाणी दोन घाट तयार करण्यात आलेले आहेत. एक घाट आयआयटी पवई लगत तर दुसरा घाट रामबाग जवळील विसर्जनस्थळी बनवण्यात आलेला आहे. दोन्ही विसर्जन स्थळी दोन-दोन भल्यामोठ्या क्रेन उभ्या करण्यात आल्या आहेत. मोठ्या गणेश मूर्ती हे क्रेन अलगद उचलून पाण्यातील तराफावर ठेवणार आहेत. विसर्जनाकरिता पाण्यात कोणत्याही गणेश भक्ताला उतरू दिले जाणार नाही.

हेही वाचा - LIVE PUNE : ढोल ताशांच्या गजरात पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

याठिकाणी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्यात कोण उतरत आहे, यावर पालिका आणि पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. तसेच पोलीस प्रशासनाचा पवई तलाव परिसरात मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

Intro:पवई तलावात घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पवई तलावाकडे गणेश भक्त गर्दी करायला सुरुवात करत आहेत सकाळपासून घरगुती गणपतीचे विसर्जन भक्तिमय वातावरणात होत आहेBody:पवई तलावात घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पवई तलावाकडे गणेश भक्त गर्दी करायला सुरुवात करत आहेत सकाळपासून घरगुती गणपतीचे विसर्जन भक्तिमय वातावरणात होत आहे .

दुपार नंतर विभागातील गणपती विसर्जन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विसर्जन स्थळी गर्दी होण्याची शक्यता आहे.
परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळ सध्या जागोजागी गणरायाची ची आरती करून विभागातून मिरवणूक काढण्याची तयारी करत आहेत. आज पावसाने उपनगरांमध्ये घेतलेली विश्रांती यामुळे आपल्या लाडक्या गणरायाचं वाजत गाजत मोठ्या आनंदात विसर्जन केले जाणार आहे .सध्या पवई तलावावर सार्वजनिक मोठे गणपती विसर्जन करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. या ठिकाणी दोन घाट तयार करण्यात आलेले आहेत एक घाट आयआयटी पवई लगतच बनवण्यात आलेला आहे तर दुसरा घाट हा रामबाग जवळील विसर्जन स्थळी बनवण्यात आलेला आहे .दोन्ही विसर्जन स्थळी दोन- दोन भल्यामोठ्या क्रेन उभ्या आहेत. मोठया गणेश मूर्ती हे क्रेन अलगद उचलून पाण्यातील तराफावर ठेवणार आहेत. विसर्जनाकरिता पाण्यात कोणत्याही गणेश भक्ताला उतरू दिले जाणार नाही याठिकाणी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत त्यामुळे पाण्यात कोण उतरत आहे यावर पालिका व पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे पोलीस प्रशासनाची पवई तलाव परिसरात चोख व्यवस्था आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.