मुंबई - महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत आयोजित 'श्री गणेश गौरव पुरस्कार' स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर बंगल्यावर जाहीर केला. त्यात माझगांव येथील ताराबाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांला प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले.
मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी या पुरस्कारांचे ३२ वे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धेत मुंबईमधील ७१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला. तज्ज्ञ परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी २० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड केली. दोन टप्प्यात या सर्व मंडळांचे परीक्षण केले गेले. त्याचा निकाल महापौर यांनी जाहीर केला. याप्रसंगी उप आयुक्त व गणेशोत्सव समन्वयक नरेंद्र बरडे तसेच स्पर्धेचे परीक्षक मंडळ उपस्थित होते. या स्पर्धेमधील पुरस्कारप्राप्त मंडळांना रोख पारितोषिक तसेच प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह दिले जाते.
माझगांवच्या ताराबाई गणेश मंडळाला प्रथम पारितोषिक प्रथम पारितोषिक ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,द्वितीय पारितोषिक दहिसर (पूर्व) गोकुळ नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, तृतीय पारितोषिक काळाचौकी येथील गं. द. आंबेकर मार्ग (काळेवाडी) सार्वजनिक उत्सव मंडळाला घोषित करण्यात आले. अंधेरी (पूर्व) येथील श्री गणेश क्रीडा मंडळाच्या गणेशमूर्तीचे मूर्तिकार सतिश गिरकर यांना तर सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून गोरेगांव (पश्चिम) येथील बेस्ट नगर गणेशोत्सव मंडळाचे सजावटकार नरेंद्र भगत यांना घोषित करण्यात आला.शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती म्हणून कांजूरमार्ग येथील शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जयवंत वारगे यांना २५ हजार रुपये, प्लास्टीक व थर्माकोल बंदीसाठी बोरीवली (पश्चिम) येथील साई दर्शन मित्र मंडळ, तसेच तसेच मुंबई सेंट्रल येथील बेलासिस रोड, बी. आय. टी. चाळ, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाला प्रत्येकी १० हजार रुपये, अवयवदान जागृतीसाठी १५ हजार रुपयांचे पारितोषिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आंबेडकर नगर, वरळी यांना घोषित करण्यात आले.
पुरस्कार
प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-) ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळद्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-) गोकुळ नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळतृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-) गं. द. आंबेकर मार्ग (काळेवाडी) सार्वजनिक उत्सव मंडळसर्वोत्कृष्ट मूर्तीकार (रु.२५,०००/-) सतिश गिरकरसर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (रु.२०,०००/-) नरेंद्र किसन भगतदोन उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी रु.१०,०००/-)१) श्री हनुमान सेवा मंडळ, काळाकिल्ला, धारावी,२) पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, ना. म. जोशी मार्ग, मुंबई