मुंबई G20 Summit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलयं, G20 परिषदेच्या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये अवतरले, हा एक सुवर्ण दिन होता. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भारताची किर्ती जगभर पोहोचवली, देशाला महासत्ता बनविण्यासाठी ते अविरत परिश्रम घेत आहेत. त्याचंच एक सकारात्मक चित्र संपूर्ण देशानं पाहिलयं. अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, युएईसह अनेक बलाढ्य राष्ट्रांचे प्रमुख दिल्लीत आले. एकमताने आणि एक भावनेने एकत्र येऊन अधिक समृद्ध आणि सुसंवादी भविष्यासाठी काम करण्याचं वचन पंतप्रधानांनी यावेळी दिलयं. या परिषदेत पंतप्रधानांनी मांडलेला ‘दिल्ली जाहीरनामा’ एकमताने स्वीकारण्यात आला. G20 समूहाने टाळ्या आणि बाकं वाजवून त्याचे स्वागत केले, हे आपले मोठे राजनैतिक यश आहे. (G20 Summit)
मोदी जागतिक स्तरावरचे नेते : वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना घेऊन भारताने G20 परिषदेचे यजमानपद स्वीकारलं आणि यशस्वी आयोजनही केलं. या राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदाचा सन्मान पंतप्रधान मोदींच्या रुपाने भारताला प्रथमच मिळाला, ही देशवासियांसाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे. या परिषदेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारत यांचं महत्त्व पुन्हा अधोरेखितं झालयं. हे देशाच्या इतिहासातले सोनेरी पान आहे. जगभरात मोदींची ‘जागतिक स्तरावरचा नेता’ अशी निर्माण झालेली प्रतिमा भारतासाठी निश्चितच अभिमानास्पद असल्याच देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलयं.
-
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ‘जग’ जिंकले !
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण दिन…
जी-२० परिषदेच्या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये अवतरले, हा एक सुवर्ण दिन होता. देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांनी भारताची किर्ती जगभर पोहोचवली,… pic.twitter.com/bpjk09EwlP
">मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ‘जग’ जिंकले !
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 10, 2023
भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण दिन…
जी-२० परिषदेच्या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये अवतरले, हा एक सुवर्ण दिन होता. देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांनी भारताची किर्ती जगभर पोहोचवली,… pic.twitter.com/bpjk09EwlPमा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ‘जग’ जिंकले !
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 10, 2023
भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण दिन…
जी-२० परिषदेच्या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये अवतरले, हा एक सुवर्ण दिन होता. देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांनी भारताची किर्ती जगभर पोहोचवली,… pic.twitter.com/bpjk09EwlP
नवी दिल्ली येथील G20 परिषदेच्या वन फ्युचर या शेवटच्या सत्रात G20 परिषदेच्या नव्या अध्यक्षांची करण्यात आलीयं. ब्राझीलचे राष्ट्रपती आणि माझे मित्र लुला दा सिल्वा यांचं अभिनंदन करतो, असं म्हणत G20 च्या अध्यक्षपदाचं गेवल (प्रातिनिधिक चिन्ह) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझिलच्या राष्ट्रपतींकडे सुपूर्द केलयं.
हेही वाचा :
- Shahrukh Khan On G20 Summit : G20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल शाहरुखनं केलं मोदींचं अभिनंद
- G20 session on One Future : पंतप्रधान मोदींकडून जी २० परिषद संपल्याची घोषणा, पुढील अध्यक्षपद 'या' देशाला मिळणार
- Deluge dampens G20 summit : कोट्यवधी खर्चूनही भारत मंडपमात तुंबलं पाणी, काॅंग्रेसची मोदी सरकारवर खोचक टीका