मुंबई- मुंबईत पेट्रोलच्या दराने शनिवारी शंभरी पार केली. मुंबईत पेट्रोल १०० रुपये २३ पैसे, तर डिझेल ९२ रुपये १७ पैसे झाले आहे. पेट्रोल दर लिटरमागे २६ पैसे, तर डिझेल दर २८ पैसै वाढ करण्यात आल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी जाहीर केले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात परभणीतील पेट्रोलचे दर आधीच शंभरीपार गेले होते. आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलदर शंभरीपार गेले आहेत. पेट्रोलचे दर मुंबईत १०० रुपये १९ पैसे झाले असून डिझेलचे दर ९२ रुपये १७ पैसे झाले आहेत.
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका -
वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचा भाव हा 90 रुपयांवर पोहोचला आहे. देशात पेट्रोल -डिझेलच्या किंमतीचा उच्चांक गाठला आहे. मे महिन्यात आतापर्यंत एकूण 16 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे 4 मे पासून इंधनाच्या दरात वाढ सुरु झाली. मे महिन्यात पेट्रोलचा दर हा 3.59 रुपये प्रतिलीटरने तर डिझेलचा दर हा 4.13 रुपये प्रतिलिटरने वाढला आहे.
दररोज पेट्रोल-डिझेल किंमती होतात अपडेट -
दररोज पेट्रोल-डिझेल किंमती अपडेट केल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किंमतीच्या आधारे, परदेशी विनिमय दरासह पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज अपडेट केल्या जातात. तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम, तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अद्ययावत करतात.
हेही वाचा-VIDEO : रस्त्यावरच उलटला दुधाचा टँकर; लुटण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी..