ETV Bharat / state

Aryan Khan Drug Case : ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल - हिंदू महासंघ

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (aryan khan) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (cordelia cruises drug party case) एनसीबीने आरोप पत्रात आर्यन खानला क्लीन चीट दिल्या विरोधात हिंदू महासंघाने (Hindu Federation) मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) याचिका दाखल (fresh petition filed against aryan khan) केली आहे.

Petition Against Aryan Khan
आर्यन खान
author img

By

Published : Dec 5, 2022, 6:17 PM IST

Updated : Dec 5, 2022, 8:21 PM IST

मुंबई : कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (cordelia cruises drug party case) एनसीबीने आरोप पत्रात आर्यन खानला (aryan khan) क्लीन चीट दिल्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) याचिका (fresh petition filed against aryan khan) दाखल केली आहे. हिंदू महासंघाने (Hindu Federation) आर्यन खान विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी याचिकेत केली आहे. तसेच याचिकावर लवकर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्ता यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना हिंदू महासंघाचे आनंद दवे

एनसीबीनं दिली होती क्लिन चीट : एनसीबीने आर्यन खानसह 6 जणांची नावं आरोपपत्रातून वगळली होती. एनसीबी कडून आरोपपत्रात आर्यन खान, आविन साहू, गोपाळ जी आनंद , समीर सेहगल, भास्कर अरोडा, मानव सिन्हा यांना क्लीन चिट देण्यात आली होती. या प्रकरणात आर्यन खान अनेक दिवस तुरुंगात होता. न्यायालयाने अनेक सुनावण्यानंतर आर्यन खानला जामीन दिला होता. त्यानंतर या प्रकरणात आर्यन खानला एनसीबीनं क्लिन चीट दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा आर्यन खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हिंदू महासंघाचे आनंद दवेंचा दावा : क्रुझ ड्रग्ज प्रकरणातून आर्यन खान यांचं नाव वगळण्यात आल्याच्या विरोधात हिंदू महासंघानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्यन खानला एनसीबीकडून क्लीन चीट देण्यात आली आल्यामुळे हिंगू महासंघाने कोर्टात धाव घेतली आहे. एका जनहित याचिकेच्या माध्यमातून आर्यन खानच्या जामिनाला आव्हान देण्यात आले आहे. तपास यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाचा नव्यानं तपास करण्याची मागणी हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी केलीय. तसेच उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून, लवकरच सुनावणी होणार असल्याचा दावा संघटनेच्या वकिलांनी केला आहे.

वकिलांचा दावा काय आहे? : या प्रकरणात पोलिसांकडे पुरावे उपलब्ध आहेत की नाही? ते न्यायालयात टिकणार की नाही ? ही बाब ठरवण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. मात्र आरोपींना निर्दोष मुक्त ठरवून न्यायालयाच्या अधिकारावर पोलिसांनी अतिक्रमण केले आहे. एखाद्या आरोपीला गुन्ह्यातून वगळण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. मात्र याप्रकरणात पोलिसांकडून अशा प्रकारची कारवाई झाली नाही. कोणत्या दबावातून आर्यनला या प्रकरणातून वगळले हे समोर यायला हवं, असे हिंदू महासंघाच्या वकिलांनी म्हटले आहे.

कार्डेलिया क्रूझवरील छापा : एनसीबीने गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवर आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यानंतर एनसीबीने क्रुझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला अटक केली होती. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण : मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा 27 दिवस जेलमध्ये रहाव लागलं होतं. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली होती. मुंबई विशेष न्यायालयाने आर्यन खान ची जामीन फेटाळून लावली होती. मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खान ने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तीन दिवस कंटिन्यू सुरू असलेल्या युक्तिवादानंतर अखेर आर्यन खानला जामीन मंजूर झाली होती.

Last Updated : Dec 5, 2022, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.