ETV Bharat / state

खादी ग्रामोद्योग विभागाचा उपक्रम ; धारावीत कुंभारकामासाठी वाटणार इलेक्ट्रॉनिक मशीन - खादी ग्रामोद्योग

खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे धारावीतील कुंभारवाड्यातील बांधवाना "इलेक्ट्रॉनिक मशीन" वाटण्यात येत आहेत. तसेच १० दिवस कुंभार कलेचे प्रशिक्षण मशीनवर देण्यात येणार आहे.

खादी ग्रामोद्योग विभागाची माहिती देताना दिव्या ढोले
author img

By

Published : Feb 22, 2019, 1:34 PM IST

मुंबई - संकल्प सिद्धी ट्रस्ट यांचा सहयोगाने आणि खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे धारावीतील कुंभारवाड्यातील बांधवाना "इलेक्ट्रॉनिक मशीन" वाटण्यात येत आहेत. तसेच खादी ग्रामोद्योगातर्फेच१० दिवस मशीनवर कुंभार कलेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

खादी ग्रामोद्योगाकडून धारावीत ९२ मशीन, २ बंबाईडर आणि २ चिखल मिसळायचे मशीन देण्यात येणार आहे. या मशीन चालवण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगामार्फत धारावी येथे १० दिवस कुंभार काम कला प्रशिक्षण राबवले जाणार आहे. त्याला आज सुरुवात झाली. हे प्रशिक्षण २ मार्चपर्यंत चालणार आहे. या प्रशिक्षणानंतर त्या मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.

धारावी कुंभारवाड्या सारख्या ठिकाणी ग्रामीण भागात जशा मातीच्या वस्तू बनवल्या जातात तशाच प्रकारच्या वस्तू येथे ही बनवल्या जातात. मात्र, शासनाकडून त्यांना या व्यवसायासाठी कधीच काही मदत मिळत नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी संकल्प सिद्धी ट्रस्टच्या अध्यक्षा दिव्या ढोले यांनी खादी ग्रामोद्योग अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी या बांधवांना सरकारी योजना लागू करुन प्रशिक्षण व इलेक्ट्रॉनिक मशीन कशा देता येतील यासाठी प्रयत्न केले. या मशीन आल्यामुळे शारीरिक श्रम कमी होणार आहेत. महिलांना माती तुडवावी लागणार नाही. तसेच सारख्याच आकाराचा वस्तू लवकरात लवकर तयार करण्यास मदत होणार आहे.

undefined

Intro:धारावी कुंभारवाड्यात पहिल्यांदाच कुंभारकामासाठी मोफत इलेक्ट्रॉनिक मशिन्स प्रशिक्षण व वितरण

मुंबई

देशात खेड्यापाड्यापासून ते शहरात प्रत्येक गोष्टी सर्वच डिजिटल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.मुंबई शहरातील धारावी कुंभार वाड्यात ही आता इलेक्ट्रॉनिक प्रगती पाहायला मिळणार आहे.
संकल्प सिद्धी ट्रस्ट यांचा सहयोगाने व खादिग्राम उद्योग आयोग तर्फे धारावीतील कुंभार वाड्यात पहिल्यांदाच कुंभार बांधवाना "इलेक्ट्रॉनिक मशीनस" वाटण्यात येत आहेत. व खाडीग्राम उद्योगा तर्फेच धारावी कुंभार वाड्यातील लोकांसाठी 10 दिवस माशीनवरच कुंभार कला कामाच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.हे काम पहिल्यांदाच होत असल्याने सर्वत्र याची चर्चा आहे व कुंभार समाज आनंदी आहे.

खादी ग्रामोद्योगा कडून धारावी कुंभार वाड्यातील कुंभाराना सध्या 92 मशीन देण्यात येणार आहेत,आणि दोन बंबाईडर अन्य दोन चिकल मिसलायचा मशीन देण्यात येणार आहेत.अनेक वर्षे खादी ग्राम उद्योग ग्रामीण भागात स्टार्ट अप, हुनर हार्ट सारखे अनेक कार्यक्रम सरकारी सुखसुविधेने राबवते.
परंतु धारावी कुंभारवाड्या सारख्या ठिकाणी ग्रामीण भागात जशी मातीच्या वस्तू बनवल्या जातात तशाच प्रकारचा वस्तू हिथे ही बनवल्या जातात. परंतु शासनाकडून त्यांना त्या व्यावसायासंबंधित कधीच काही मदत मिळाली नाही.त्यामुळे संकल्प सिद्धी ट्रस्टच्या अध्यक्ष, भाजपा सचिव दिव्या ढोले यांचा साह्याने खादी ग्रामउद्योग अधिकाऱ्यांशी खादी ग्रामउद्योग कशा प्रकारे धारावीतील या कुंभाराना सरकारी स्कीम लागू करून प्रशिक्षण व इलेक्ट्रॉनिक मशीन कशा देता येतील यासाठी प्रयत्न केले त्यामुळेच हे शक्य झाले आहे.

खादी ग्रामउद्योग आयोगामार्फत धारावीत कुंभारवाडा येथे प्रथम दहा दिवस कुंभार काम कला प्रशिक्षण राबवले जाणार आहे.त्याला आज सुरवात झाली व 2 मार्चला ते पूर्ण होणार आहे.आणि ह्या प्रशिक्षणानंतर त्या मशिन्स वाटप केल्या जाणार आहेत.ह्या मध्ये खादी ग्रामउद्योगा मधून काही प्रशिक्षक जाऊन त्या मशिन्सचं ट्रेनिंग लोकांना देणार आहेत.

या मशिन्स आल्यामुले शारीरिक श्रम कमी होणार आहेत,महिलांना जे माती तुडवावी लागते ते थांबेल, व सारख्याच आकाराचा वस्तू लवकरात लवकर बनतील.या अगोदर ही येथील लोकांनी काही मशिन्स पाहिल्यात ,पण ह्या आता खादी ग्राम उद्योग पहिल्यांदाच देणार आहे त्या मशीन आधुनिक ऍडव्हान्स आहेत आणखी धारावी कुंभारवाडयाचा ह्यावरील रिपोर्ट पाहून आणखी नवीन उपक्रम खादी ग्राम उद्योग संकल्प सिद्धी ट्रस्टच्या सहाय्याने लोकां पर्यंत पोहचवले असे दिव्या ढोले यांनी सांगितलेBody:.Conclusion:.बाईट, व्हिज्युअल व्हाट्सअप्प ही केलेत कृपया त्या लावाव्यात
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.