मुंबई : फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाणे गुन्हे शाखा येथे गुन्हा नोंद करून या गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय चंदनशिवे, पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम हे करत होते. (Online shopping) तपासी अधिकारी व पथक यांनी गुन्हयात वापरण्यात आलेल्या विविध बँक खात्यांचा तपशील, मोबाईल क्रमांक, ई-मेल यांचा तपशिल प्राप्त करून प्रत्येकवेळी प्राप्त होणाऱ्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून त्या माहितीची कडी जुळवून हा गुन्हा करणाऱ्या टोळीबाबत माहिती मिळवली. (financial fraud) त्यावरून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरिता सायबर शाखेत विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली. (Fraud Gang Arrested In Mumbai)
कसा घडला गुन्हा ?
याप्रकरणी ३० ऑगस्ट २०२२ ला गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी यांच्या राहत्या घरी OLX च्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने क्यूआरकोड स्कॅन करून फसवणूक करून सतरा लाख ८२ हजार रूपये आरोपींनी लंपास केले होते. २८ ऑगस्ट २०२२ला रात्री १० ते २९ ऑगस्ट २०२० च्या मध्यरात्री २ वाजण्याच्यादरम्यान फिर्यादी यांनी गुगलवरून OLX Surat ओपन करून त्यावर त्यांचे जुने फर्निचर विक्रीसाठी टाकले असता अशोककुमार या अनोळखी इसमाने ९१४२३०६६१६ या मोबाईल क्रमांकाद्वारे त्यांना संपक्र करून तो ते फर्नीचर घेण्यास इच्छुक आहे, असे भासवून त्यांना पेमेंट करण्याकरीता whats appच्या माध्यमातून क्युआरकोड पाठवून तो त्यांच्या ICICI बँकेच्या मोबाईल ऍपमधून स्कॅन करण्यास सांगून त्यांचेकडून सुरूवातीला ९,०००/- रूपये रक्कम डेबीट करून घेतली आणि ती रक्कम परत करण्याच्या बहाण्याने त्यांना फेडरल बँक आणि कोटक बँकेचे अकांऊट डिटेल्स पाठवून त्यावर जबरदस्तीने पैसे पाठविण्यास भाग पाडून त्यांची एकूण १७ लाख ८२ हजार रुपयांची OLX च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक केली.
आरोपींनी विविध शहरांतून अटक : मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांनी पोलीस मदत मिळण्याकरीता राज्यस्थान पोलीस दलातील वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्यामुळे राजस्थान पोलीसांनी तपासाकरीता पोलीस मदत पुरविली. त्यामुळे या पोलीस पथकाच्या मदतीने राहण्याचे ठिकाण बदरवास जिल्हा भरतपुर येथुन गुन्हयातील आरोपी सवसुख रजदार याला अटक करण्यात आले. त्याचवेळी दुसऱ्या पोलीस पथकाने सेक्टर-८, प्रताप नगर परिसर, सांगानेर, जयपुर, राजस्थान येथे गस्त करून परिसराचा अंदाज घेवून पाहीजे आरोपीची गोपनीय पद्धतीने माहीती प्राप्त करून प्रताप नगर स्थानिक पोलीस ठाणेच्या मदतीने आरोपी तुलसीराम रोडूलाल मिणा यास त्याचे राहते घरून अटक केली. त्यांनतर पोलीस पथकाने अटक आरोपीचे साथीदार पाहीजे. आरोपी हा खोह चौराह, खोह मार्केट, तहसील-दीघ, जिल्हा भरतपूर येथे येत असल्याबाबत गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक पोलीसांच्या मदतीने सापळा रचून गुन्हयातील आरोपी अजित पोसवाल यास खोह मार्केट येथून अटक केली. पोलीस पथकाने आरोपीबाबत प्राप्त झालेल्या माहितीवरून मुदसेरस मथुरा, शेरगढ़-मथुरा- उत्तरप्रदेश या परिसरात पाळत ठेवून स्थानिक शेरगढ पोलीस ठाणेचे मदतीने चौथा आरोपी ईरशाद सरदार यास अटक केली. अशाप्रकारे सदर गुन्हयामध्ये पोलीस पथकाने एकूण ४ आरोपींना राजस्थान व उत्तरप्रदेश राज्यातून अटक केलेली आहे.
मुद्देमाल जप्त : या आरोपींकडून रोख रक्कम रुपये २,००,०००, एकूण ९ मोबाईल फोन, ३२ विविध बँकांचे डेबीट कार्ड, ०१ येस बँकेचे चेकबुक, १ एयु स्मॉल फायनान्स बँकेचे चेकबुक (वेलकम किटसह), ०४ विविध कंपन्यांचे सिमकार्ड अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील तपासादरम्यान ८३५ मोबाईल क्रमांक व ३८ आयएमईआय क्रमांक प्राप्त झालेले असून वरील मोबाईल क्रमांक व आय.एम.ई.आय. क्रमांकाची माहिती खालील गुन्ह्यांशी तसेच NCCRP पोर्टलवरील तक्रारींशी मिळतीजुळती आलेली आहे.