मुंबई - मनी लॉन्ड्रिंगसंदर्भात ईडीकडून तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ईडीकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. याच प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व त्यांचा मुलगा विहंग सरनाईक हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. मात्र, याच दरम्यान मुंबई पोलिसांनी टॉप्स सिक्युरिटीच्या संदर्भात तक्रारदार रमेश अय्यर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
टॉप्सच्या कर्मचाऱ्यांचा पीएफ व मासिक वेतन लटकले..
रमेश अय्यर यांच्यावर टॉप्स सिक्युरिटीमध्ये आर्थिक फसवणुकीसंदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. टॉप्स सिक्युरिटीचे मालक राहुल नंदा यांच्यानंतर रमेश अय्यर यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. टॉप्स सिक्युरिटीच्या आर्थिक व्यवहारात घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वी टॉप्स सिक्युरिटीच्या 200 कर्मचाऱ्यांनी त्यांचे मासिक वेतन, व भविष्य निर्वाह निधी संदर्भात कुठलेही उत्तर टॉप्स सिक्युरीटीच्या मालकांकडून मिळत नसल्याची तक्रार केली होती.
रमेश अय्यरने दाखल केली होती तक्रार..
रमेश अय्यर यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांच्या ऍलो गेट पोलीस ठाण्यात कंपनीचे संचालक राहुल नंदा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या नंतर ईडीकडून काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुंबई ठाण्यातील कार्यालय व घरावर छापेमारी करण्यात आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे मालक अमित चांदोले हे आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. एमएमआरडीएमधील 175 कोटी रुपयांच्या फसवणुकीसंदर्भात ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -'...तेव्हा बहुमताची सरकारेसुद्धा डचमळून कोसळतात व बलदंड समजले जाणारे नेतृत्व उडून जाते'