ETV Bharat / state

ऑनलाइन शॉपिंग करताना सावध राहा, 'विशेष प्रोग्रॅम कोड'ने केली जातेय लूट - विशेष प्रोग्रॅम कोड

डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने सायबर भामटे सध्या सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. सायबर गुन्हेगारांनी यासाठी ऑनलाइन व्यवहारांच्या संदर्भात एक नवीन प्रोग्रॅम कोड बनविला आहे. हा प्रोग्रॅम कोड इंटरनेटवरील ऑनलाइन शॉपिंगसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध वेबसाइटमध्ये लपवून ठेवला जातो.

special program code fraud  online shopping fraud  lockdown cyber crime  cyber crime online shopping  ऑनलाइन फसवणूक  विशेष प्रोग्रॅम कोड  लॉकडाऊनमधील सायबर क्राईम
'विशेष प्रोग्रॅम कोड'ने केली जातेय लूट
author img

By

Published : Jun 23, 2020, 12:47 PM IST

मुंबई - लॉकडाऊनमध्ये राज्यातील सर्व दुकानातील व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांकडे फक्त ऑनलाइन शॉपिंग हा एकमेक पर्याय उरला होता. त्यामुळे नागरिकांनी घरातील किराणा सामानापासून तर सर्व आवश्यक असणाऱ्या इतर गोष्टींची ऑनलाइन खरेदी करण्यास सुरुवात केली. सध्या सर्व व्यवहार क्रेडीट-डेबिट कार्ड आणि नेटबँकिंगद्वारे मोठ्या प्रमाणात होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या सायबर विभागाकडे फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे समोर आहे.

ऑनलाइन शॉपिंग करताना सावध राहा, 'विशेष प्रोग्रॅम कोड'ने केली जातेय लूट

अशी चोरली जाते माहिती -
डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने सायबर भामटे सध्या सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. सायबर गुन्हेगारांनी यासाठी ऑनलाइन व्यवहारांच्या संदर्भात एक नवीन प्रोग्रॅम कोड बनविला आहे. हा प्रोग्रॅम कोड इंटरनेटवरील ऑनलाइन शॉपिंगसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध वेबसाइटमध्ये लपवून ठेवला जातो. एखादा ग्राहक ऑनलाइन खरेदी केल्यानंतर पैसे भरण्यासाठी आपले क्रेडिट किंवा डेबिट डिटेल्स, इंटरनेट बँक अकॉउंटचा आयडी व पासवर्ड, डेबिट/क्रेडिट कार्ड्सचे पिन क्रमांक, सीव्हीव्ही (CVV) क्रमांक, मोबाइल क्रमांक इत्यादी भरतात, तेव्हा हा प्रोग्रॅम कोड ही सर्व माहिती कॉपी (copy) करतो. यानंतर सायबर भामटे चोरलेल्या या माहितीची नोंद करतात. अशा छुप्या पद्धतीने चोरलेली माहिती एकत्र करून सायबर चोरटे इंटरनेटवरील डार्कनेटवर किंवा सायबर गुन्हेगारांना विकतात. या माहितीचा सर्वाधिक वापर ऑनलाइन लूट करण्यासाठी केला जात आहे.

काय करायला हवे -

  • ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना ग्राहकांनी सावध राहायला हवे.
  • शक्यतो ऑनलाइन पेमेंट (payment) न करता कॅश ऑन डिलिव्हरी सारखा ( 'Cash On Delivery) पर्याय निवडणे केव्हाही चांगले.
  • तुम्ही ऑनलाइन व्यवहार केल्यावर लगेच तुमच्या संबंधित बँकेच्या खात्यातील रक्कम तपासून पाहा, ज्यामध्ये फक्त खर्च झालेली रक्कम वजा झाली असली पाहिजे.
  • तुम्ही ऑनलाइन आर्थिक व्यवहार ज्या वेबसाइटवर करत असाल, ती वेबसाइट सुरक्षित आहे की नाही, याची सर्वप्रथम खात्री करून घ्या.

चार महिन्यांत मुंबईत ९३८ सायबर गुन्हे -

1 जानेवारी ते मे या काळात मुंबईत 938 सायबर गुन्हे घडले असून यात संगणक कार्यप्रणालीवर सायबर हल्ल्याचे 4 गुन्हे, नायजेरियन ऑनलाइन फ्रॉडचे 15 गुन्हे, क्रेडिट कार्ड प्रकरणात 212 गुन्हे यांच्यासह इतर प्रकरणात 614 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.