ETV Bharat / state

Anil Deshmukh Bail Application : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळला - अनिल देशमुख जामीन अर्ज फेटाळला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former HM Anil Deshmukh ) यांच्या डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने हा निर्णय दिला. 100 कोटी कथित वसुली प्रकरणी न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला.

anil deshmukh
अनिल देशमुख
author img

By

Published : Jan 18, 2022, 3:47 PM IST

Updated : Jan 18, 2022, 5:26 PM IST

मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांना अटक करण्यात आली होती. ईडीने अटक केल्यापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये ( Anil Deshmukh in Arthur Road jail ) आहे. देशमुख यांनी 04 जानेवारी मुंबई PMLA कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज मंगळवारी रोजी न्यायालयाने निकाल देत अनिल देशमुख यांचा अर्ज फेटाळून लावला. ( Anil Deshmukh Bail Application Rejected ) यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ईटीव्ही भारत प्रतिनिधी संतोष मोरे याबाबत माहिती देताना

अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून त्यांच्या जामीनासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. मात्र, देशमुखांना जामीन मिळणे कठीण होऊन बसले आहे. विशेष म्हणजे, मुंबई सत्र न्यायालयाने आज अखेर अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. देशमुख आणि राज्य सरकारला हा सर्वात मोठा झटका आहे. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटळण्याबाबतचा निर्णय विशेष पीएमएलए कोर्टाने आज दिला. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना 2 नोव्हेंबरला ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

अनिल देशमुख यांच्याविरोधात 7 हजार पानी आरोपपत्र -

100 कोटी कथित प्रकरणात तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली. यानंतर गेल्या 78 दिवसांपासून अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या पत्नीचा भाऊ यांनादेखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.

अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने फरार घोषित केले आहे. या प्रकरणात एकूण 3 जणांना ईडीने फरार घोषित केले आहे. वारंवार समन्स देवून देखील अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही. मात्र, याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे, याकरिता ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.

हेही वाचा - नाना पटोले, 'त्या' गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करा, माधव भांडारी यांचे खुले आव्हान

नेमकं प्रकरण काय?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.

Last Updated : Jan 18, 2022, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.