ETV Bharat / state

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर सुनावणी नाही, जेलमधील मुक्काम वाढला - जेलमधील मुक्काम वाढला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावर आजही सुनावणी झाली नाही. अनिल देशमुख यांनी सीबीआय प्रकरणात जामीनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात 2 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन (bail application) फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Anil Deshmukh
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर सुनावणी नाही, जेलमधील मुक्काम वाढला
author img

By

Published : Nov 29, 2022, 3:55 PM IST

मुंबई : विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन नाकारल्याच्या विरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे. न्यायमूर्ती एम. एस कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. मात्र, ईडीचे वकील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांची तब्येत ठीक नसल्याने आज न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. आज ईडीच्या वतीने युक्तिवाद करण्यात येणार होता. मात्र,पुन्हा ईडीच्या वतीने तारीख मागितल्याने अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी याला विरोध दर्शवत केवळ वेळ काढूपणा करत असल्याचे कोर्टासमोर युक्तीवादा दरम्यान म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Police Commissioner Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट ( recovery target of Rs 100 crore) दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.

यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे (Suspended API Sachin Vaze) यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे (Sanjeev Palande) आणि खासगी सहायक कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.