ETV Bharat / state

Shiv Sena BMC : ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पालिका मुख्यालयात ठोकला तळ, 'हे' आहे कारण.. - shiv sena party office

विधानभवन आणि लोकसभा येथील पक्षाचे कार्यालय ताब्यात घेतल्यावर मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालय शिंदेंची शिवसेना ताब्यात घेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रोज पालिकेत येऊन तळ ठोकून आहेत.

Shiv Sena News
उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पालिकेत
author img

By

Published : Feb 21, 2023, 8:32 PM IST

उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पालिकेत

मुंबई: शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह दिले आहे. त्यानंतर शिंदे गटाने विधानभवन, लोकसभेतील पक्ष कार्यालय ताब्यात घेतले आहे. मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालय शिंदे गट ताब्यात घेईल म्हणून उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पालिकेतील पक्ष कार्यालयाबाहेर तळ ठोकून आहेत.

शिवसेनेमध्ये फूट: शिवसेनेतील ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे मुंबईत येऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केले. याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालय तसेच निवडणूक आयोगाकडे गेला आहे. निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाराष्ट्रातील विधानभवन व लोकसभेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतले आहे.

माजी नगरसेवक तळ ठोकून: विधानभवन आणि लोकसभा येथील पक्षाचे कार्यालय ताब्यात घेतल्यावर मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालय शिंदे गट ताब्यात घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रोज पालिकेत येऊन तळ ठोकून आहेत. शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक यांच्यात मागील महिन्यात वाद झाला होता. त्यावेळी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली होती. त्यानंतर पोलिसांच्या अहवालावरून शिवसेनेचे तसेच इतर पक्षांची कार्यालये पालिका आयुक्तांनी सिल केली आहेत.

पालिका मुख्यालयात ठाकरे गटाची गर्दी: आम्ही सर्व माजी नगरसेवकांना वेळ ठरवून दिला आहे. ते नेहमी इथे येवून येणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवत असतात. पालिकेतील पक्ष कार्यालय सिल आहेत. ती अजून उघडलेली नाहीत. पालिका आयुक्त आणि प्रशासक शिंदे गटाच्या चार ते पाच नगरसेवकांना जर आयुक्त कार्यालय उघडून देणार असतील तर आमच्याकडे ८५ नगरसेवक आहेत. आमच्या संखेप्रमाणे आम्हाला कार्यालय मिळायला हवे. त्यांनी समजुतीने घेतलं तर आम्ही समजुतीने घेवू. त्यांनी राडा केला तर आम्हीही राडा करू असा इशारा माजी माहापौर आणि माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी दिला आहे.

पालिकेला पोलीस छावणीचे रूप: महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पालिकेतील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय सिल करण्यात आली आहेत. कालच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्या नंतर शिंदे गटाने विधिमंडळातील कार्यालय ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे शिंदे गट पालिकेतील कार्यालय ताब्यात घेतील अशी कुणकुण लागल्याने ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक या ठिकाणी जमले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा: ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार वेळेत पगार; सरकारने पैशाची अशी केली सोय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.