ETV Bharat / state

Uddhav Thackeray News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २१ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत महाराष्ट्र दौऱ्यावर; आगामी निवडणुकीची रणनीती आखली जाणार - २१ फेब्रुवारीपासून तीन मार्चपर्यंत महाराष्ट्र दौरा

शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे कमालीचे आक्रमक झाले आहेत. गद्दांराना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ते येत्या 21 फेब्रुवारीपासून 3 मार्चपर्यंत महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत.

Uddhav Thackeray
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Feb 19, 2023, 10:34 AM IST

मुंबई : या महाराष्ट्र दौर्यादरम्यान जुन्या शिवसैनिकांच्या गाठीभेटी आमदार खासदारांच्या बैठका घेण्यावर यावेळी भर दिला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असा महत्वपूर्ण निकाल दिला. हजारो शिवसैनिकांची मातोश्री रीघ लागली. गर्दी वाढल्याने उद्धव ठाकरे यांनी मातोश्री समोरील चौकात गाडीच्या टफावरून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. महाशिवरात्रीच्या दिवशी चोरांनी शिवधनुष्य बाण चोरला आहे. मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. निवडणूक आयोगाने गुलामी केली. सरकारी यंत्रणा गुलाम बनल्या आहेत. शिवसेना संपवणे शक्य नाही. शिवसैनिकांची ताकद जोपर्यंत आहे, तोपर्यंत कितीही गद्दारांच्या पिढ्या आल्या तरी त्यांना पुरून उरणार, असा सूचक इशारा उध्दव ठाकरेंनी दिला.

शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न : शिवधनुष्य चोरून नेला आहे. रावणाने देखील शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उताणा पडला होता. गद्दारांना पक्षाचे नाव, चिन्ह आणि बाळासाहेबांचा चेहरा हवा आहे. स्वतःचे काही कर्तुत्व नाही. ज्या चोरांनी धनुष्यबाण चोरलेले आहे, मर्द असतील तर त्यांनी चोरलेले धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे जावे. आम्ही मशाल घेऊन निवडणुकीत उतरतो, अशा शब्दांत लालकरले. तसेच ही लढाई आता सुरू झाली आहे. निवडणुका होऊन जाऊ दे. ताकद आणि हिमतीचे शिवसैनिक जोपर्यंत उभे आहेत, तोपर्यंत कोणीही शिवसेना संपवणार नाही, असे थेट आव्हान ठाकरेंनी शिंदे गट, भाजप आणि निवडणूक आयोगाला दिले आहे.

आगामी निवडणुकीची रणनीती आखली जाणार : शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर शिवसैनिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मुलाप्रमाणे वाढवलेली शिवसेना आता ठाकरेंविना झाल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. अनेकांना हे दुःख सहन झालेले नाही. साहेब, फक्त आदेश द्या, अशी सातत्याने विनंती शिवसैनिक करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राज्यभरातून शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी मातोश्रीवर दाखल होत आहेत. संतप्त शिवसैनिकांना धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे हे येत्या २१ फेब्रुवारीपासून ३ मार्चपर्यंत महाराष्ट्र फिरणार आहेत. दरम्यान, जुन्या शिवसैनिकांच्या गाठी - भेटी घेतील. आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत आगामी निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे. ठाकरेंच्या या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा : Shiv Jayanti 2023 : प्रत्येक किल्ल्यांवर का असतात शिव मंदिर? पाहा काय आहे इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.