ETV Bharat / state

'झाडा'झडती..! वनमंत्र्यांनी दिले मुनगंटीवारांच्या चौकशीचे आदेश - प्रधान सचिव

तेहत्तीस कोटी वृक्ष लागवडीच्या योजनेत अनियमितता आढळल्याने माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चौकशीचे आदेश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.

वनमंत्री संजय राठोड
वनमंत्री संजय राठोड
author img

By

Published : Feb 19, 2020, 5:15 PM IST

मुंबई - "एकच लक्ष तेहत्तीस कोटी वृक्ष" ही योजना राबवून राज्य हिरवेगार आणि निसर्ग संपन्न करण्याचे उद्दिष्ट राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठेवले होते. त्यानुसार त्यांनी योजनाही राबविली होती. मात्र, विद्यमान वनमंत्री संजय राठोड यांनी या योजनेतील अनियमिततेच्या चौकशीचे आदेश वन विभागाचे प्रधान सचिव व्ही. बी. रेड्डी यांना दिले आहे.

राज्यात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी वृक्ष लागवड योजना राबविली होती. मात्र, राज्यातील काही ठिकाणी या वृक्ष लागवडीत अनियमितता झाल्याच्या काही आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. शिवाय राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही त्यांच्या मतदारसंघात झालेल्या वृक्ष लागवडीत मोठी अनियमितता झाल्याची तक्रार वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली होती.

त्यामुळे वनमंत्री राठोड यांनी ज्या भागात या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्या ठिकाणी राबविण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करा, असे आदेश वन विभागाचे प्रधान सचिव व्ही. बी. रेड्डी यांना वनमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे या आदेशावरून भविष्यात चांगलेच राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - शिवजयंतीनिमीत्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह मुंबईच्या महापौरांकडून अभिवादन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.