ETV Bharat / state

मुंबईकरांच्या विकासाच्या लढाईत 'मावळ्यांची' कामगिरी महत्वाची - मुख्यमंत्री - cm Uddhav Thackeray visit Coastal Road

कोरोनाच्या लढाईत मुंबई महानगरपालिकेने जगाने दखल घ्यावे, असे काम केले आहे. आता मुंबईकरांच्या विकासाच्या लढाईतही आपण असेच पुढे राहू. त्यासाठी या लढाईत अशा अनेक 'मावळ्यांची' कामगिरी महत्वाची ठरेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Coastal Road News Mumbai
कोस्टल रोड बातमी मुंबई
author img

By

Published : Jan 11, 2021, 3:50 PM IST

मुंबई - कोरोनाच्या लढाईत मुंबई महानगरपालिकेने जगाने दखल घ्यावे, असे काम केले आहे. आता मुंबईकरांच्या विकासाच्या लढाईतही आपण असे पुढेच राहू. त्यासाठी या लढाईत अशा अनेक 'मावळ्यांची' कामगिरी महत्वाची ठरेल. माझी मुंबई आणि माझी महानगरपालिका, हा मुंबईकरांचा अभिमान आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हेही वाचा - सोनू सूदची उच्च न्यायालयात धाव; सुनावणी 13 जानेवारीपर्यंत तहकूब

मुंबई महापालिका आणि शिवसेनेचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडसाठी दोन बोगदे खणले जात आहेत. त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना, मुंबईच्या विकासासाठी जगात उपलब्ध असलेले सर्वोत्त्म असे जे तंत्रज्ञान, विज्ञान असेल ते आणण्याची आपली परंपरा राहिलेली आहे. यापुढेही ही परंपरा अशीच चालू ठेवणार आहोत. मुंबईच्या दृष्टीने आजचा हा समाधान देणारा आणि महत्वाचा क्षण आहे. २०१२ पूर्वीच आपण या समुद्री मार्गाची संकल्पना माडंली होती. वांद्रे-वरळी सी-लिंकलाच पुढे जोडणारा हा मार्ग असेल, अशी संकल्पना होती.

मुंबईला सुंदर असा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राच्या या क्षितीजावर समुद्री मार्गही शोभून दिसणारा आहे. यासाठी आपण अप्रतिम असे नियोजन केले होते. कामही धुमधडाक्यात सुरू केले होते. मध्येच कोरोनाचे संकट आले. अजूनही ते गेलेले नाही. तरीही अनेक गोष्टी ठप्प झाल्या असतानाही या कोस्टल रोडचे काम मंदावू दिलेले नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लढाईत मावळाच लढतो -

कोणतेही काम पुढे नेताना केवळ नेता असून भागत नाही. त्यासाठी लढवय्ये मावळ्यांची गरज असते, तसेच या मावळा यंत्रणेचे काम असेल. रणांगणात मावळाच लढत असतो. तसे या मुंबई महापालिकेच्या या कामात आयुक्तांपासून ते वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ, हे काम करणारी कंपनी, अभियंते, कर्मचारी हे सगळेच असे मावळे आहेत.

मुंबईकरांचा वेळ वाचेल -

१९९५-९९ मध्ये युती सरकारच्या काळात वाहतुकीची समस्या जाणवू लागताच आपण मुंबईत ५५ उड्डाण पूल उभे केले. आता तेही पूल कमी पडायला लागले आहेत. उपनगरातील जनतेला थेट शहरात अधे-मधे न थांबता यायचे झाल्यास आता हा समुद्री मार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यांचा प्रवासही नयन रम्य होणार आहे. मुळात या समुद्री मार्गात भूयारी मार्ग मोठ्या लांबीचा आहे. त्या कामाची आज सुरवात करत आहोत. हा भूयारी मार्ग थेट मलबार हिल खालून, गिरगाव चौपाटीवर निघणार आहे. हे काम लवकरात लवकर म्हणजे नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण होईल, असा विश्वास आहे. उपनगरांतून येणाऱ्या मुंबईकरांसाठी तो लवकरात लवकर वापरात येईल, अशी आशा असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मावळा मशीन नेमके काय आहे?

बोगदा खणणारे मावळा मशीन (टीबीएम) हे या प्रकल्पातील महत्त्वाचे साधन आहे. ही मशीन 12.19 मीटर व्यासची आहे. ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठ्या व्यासाची टीबीएम मशीन आहे. बोगद्याचा तयार केलेला व्यास 11 मीटर आहे. बोगद्यात सर्व सुरक्षेची व्यवस्था असेल. या टीबीएम मशीनला मावळा असे नाव देण्यात आले आहे. अरबी समुद्राखालील तब्बल 175 एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. तर, अजून 102 एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. इतकेच नाही तर, या मार्गावर समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे असतील. हे बोगदे खोदण्यासाठी मावळा ही मशीन आणली आहे.

वेळेत काम पूर्ण करू -

13 हजार कोटीचे हे काम असून, इतका मोठा प्रकल्प करणारी मुंबई महापालिका पहिली पालिका आहे. कोस्टल रोड हा 10.5 कि.मीचा रस्ता आहे. या रस्त्यावर दोन बोगदे असणार आहेत. याचा 12 मीटर इतका व्यास असणार असून, त्याचे काम आज सुरू होत आहे. हा देशातील सर्वात मोठ्या व्यासाचा बोगदा आहे. एक बोगदा खणायला 9 महिन्याचा कालावधी लागणार आहे. पहिला बोगदा ऑगस्टमध्ये, तर दोन्ही बोगदे जून 2022 पर्यंत पूर्ण होईल. जून 2023 पर्यंत कोस्टल रोडचे काम पूर्ण होईल. कोस्टल रोडचे बांधकाम आम्ही वेळेवर पूर्ण करू, असे पालिका आयुक्त इकबाल सिंग यांनी म्हटले.

हेही वाचा - 'बर्ड फ्ल्यू' संदर्भात मुख्यमंत्री घेणार बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.