ETV Bharat / state

राणी बागेतील फुलांचे देखावे वेधताहेत मुंबईकरांचे लक्ष - rani bauh mumbai

मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान विभागातर्फे वीरमाता जिजामाता उद्यानात फुलांपासून मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वास्तूंचे आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत. हे प्रदर्शन सर्व मुंबईकरांना 5 फेब्रुवारीपर्यंत पाहता येणार आहे.

mumbai
राणी बागेतील फुलांचे देखावे वेधताहेत मुंबईकरांचे लक्ष
author img

By

Published : Feb 1, 2020, 10:27 AM IST

मुंबई - भायखळा येथील राणीच्या बागेत मुंबईचे वैभव अवतरले आहे. पालिकेच्या उद्यान विभागाकडून राणीबागेत झाडे आणि फुलांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यात गेट वे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट, बेस्टची पहिली बस असलेली ट्राम, कापड गिरणी, चिमणी, पेंग्विन, चित्रनगरीचे प्रतीक असलेला कॅमेरा, मुंबईचा डबेवाला यांच्या पाना-फुलांपासून बनलेल्या प्रतिकृतीचे आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत.

राणी बागेतील फुलांचे देखावे वेधताहेत मुंबईकरांचे लक्ष

हेही वाचा - 'मूकनायक' शताब्दी : 'बाबासाहेबांना पत्रकार म्हणून स्वीकारले पाहिजे'

पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे दरवर्षी फुलझाडे, फळझाडांचे उद्यान प्रदर्शन आयोजित केले जाते. यावर्षी 'मुंबईचे मानबिंदू' ही प्रदर्शनाची संकल्पना असून त्याअंतर्गत या प्रतिकृती तयार केल्या आहेत. प्रदर्शनाचे हे रौप्य महोत्सवी (२५ वे) वर्ष आहे. वीरमाता जिजामाता भोसले उद्यानात मध्यवर्ती संकल्पना घेऊन उद्यान खात्यातर्फे दरवर्षी उद्यान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रदर्शनात कुंड्यांमध्ये वाढवलेली फुलझाडे, फळझाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोन्साय यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनाबरोबरच विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकामाविषयक पुस्तके खरेदी दालनात ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा - 'सारथी' संस्थेमध्ये मोठा घोटाळा; अनियमिततेच्या अहवालात धक्कादायक माहिती

सेल्फी पॉईंटचे आकर्षण

फुलांपासून तयार केलेले अनेक सेल्फी पॉईंट या ठिकाणी बनवण्यात आले आहेत. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता येत नाही. 2016 मध्ये या प्रदर्शनाला 50 हजार लोकांनी भेट दिली. 2017 मध्ये 75 हजार लोकांनी तर 2018-19 मध्ये दीड लाख लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली होती. या वर्षीच्या प्रदर्शनाला त्यापेक्षाही जास्त लोक भेट देतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रदर्शनाचा कालावधी वाढवला

31 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत राणी बागेत वार्षिक उद्यान प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त मुंबईकरांना व्हावा आणि मुंबईमध्ये पर्यावरण रक्षणाची जागृती करता यावी, यासाठी हे प्रदर्शन आणखी तीन दिवस वाढवण्यात आले आहे. यामुळे आता या हे प्रदर्शन 5 फेब्रुवारी पर्यंत पाहता येणार आहे.

Intro:मुंबई - भायखळा येथील राणी बागेत मुंबईचे वैभव अवतरले आहे. पालिकेच्या उद्यान विभागाकडून राणीबागेत झाडे व फुलांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून त्यात यात गेट वे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट, बेस्टची  पहिली बस असलेली ट्राम, कापड गिरणी, चिमणी, पेंग्विन, चित्रनगरीचे प्रतीक असलेला कॅमेरा, मुंबईचा डबेवाला यांच्या पानां-फुलांपासून बनलेल्या प्रतिकृती पाहायला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. Body:पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे दरवर्षी फुलझाडे-फळझाडांचे उद्यान प्रदर्शन आयोजीत केले जाते. या वर्षी "मुंबईचे मानबिंदू" ही प्रदर्शनाची संकल्पना असून त्याअंतर्गत या प्रतिकृती उभारल्या गेल्या आहेत. प्रदर्शनाचे हे रौप्य महोत्सवी (२५ वे) वर्ष आहे. वीरमाता जिजामाता भोसले उद्यानात मध्यवर्ती संकल्पना घेऊन उद्यान खात्यातर्फे दरवर्षी उद्यान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रदर्शनात कुंड्यांमध्ये वाढवलेली फुलझाडे-फळझाडे, फळझाडयांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोन्साय यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रदर्शनाबरोबरच विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकामविषयक पुस्तके खरेदी दालनात ठेवण्यात आली आहेत. 

सेल्फी पॉईंटचे आकर्षण -
फुलांपासून तयार केलेले अनेक सेल्फी पॉईंट या ठिकाणी बनवण्यात आले आहेत. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता येत नाही.  २०१६ मध्ये या प्रदर्शनाला ५० हजार लोकांनी भेट दिली. २०१७ मध्ये ७५ हजार लोकांनी तर २०१८-२०१९ मध्ये दीड लाख लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली होती. या वर्षीच्या प्रदर्शनाला त्यापेक्षा जास्त लोक भेट देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रदर्शनाचा कालावधी वाढवला - 
३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत राणीबागेत वार्षिक उद्यान प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त मुंबईकरांना व्हावा आणि मुंबईमध्ये पर्यावरण रक्षणाची जागृती करता यावी यासाठी हे प्रदर्शन आणखी तीन दिवस वाढवण्यात आले आहे. यामुळे आता या हे प्रदर्शन ३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या दरम्यान पाहता येणार आहे. 

बातमीसाठी प्रदर्शनाचे महापौरांच्या बाईटसह pkgConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.