मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणावर आपली वर्णी लावून घेण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू होती. यापूर्वीचे आयुक्त श्रीनिवास यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर या पदासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डॉक्टर संजय मुखर्जी यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुखर्जी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील 1996 च्या तुकडीतील असून ते नागपूरचे आहेत.
एमएमआरडीए आयुक्तपदी डॉक्टर संजय मुखर्जी - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी मनीषा म्हैसकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन आणि राज्य शिष्टाचार विभागाचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे. अनिल डिग्गीकर यांच्याकडे सिडकोच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव पदी डॉक्टर के एच गोविंद राज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोविंदराज यांच्याकडे यापूर्वी एमएमआरडीए अतिरिक्त महानगर आयुक्त पदांची जबाबदारी होती. तर आता एमएमआरडीए च्या आयुक्त पदाची जबाबदारी डॉक्टर संजय मुखर्जी यांच्याकडे देण्यात आली आहे.
२४ तासात दुसरी बदली- मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांची २४ तासात पुन्हा बदली करण्यात आली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या बदलांमध्ये मंत्रालयातील नगर विकास विभाग २ मध्ये त्यांची प्रधान सचिव म्हणून बदली झाली होती. परंतु अवघ्या २४ तासांमध्ये आशिष शर्मा यांना पुन्हा नवीन नियुक्ती देण्यात आली आहे. नव्या आदेशाप्रमाणे शर्मा यांना एमएमआरडीए मध्ये अतिरिक्त महानगर आयुक्त २ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
पुढील आठवड्यात आणखी बदल्या- पहिल्या टप्प्यात शुक्रवारी बदली झालेली अधिकारी अद्यापही नव्या पदांवर रुजू झालेले नाही आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात बदली झालेले अधिकारी नवीन जबाबदाऱ्या स्वीकारणार आहेत. अशामध्ये पुढील आठवड्यात आणखीन काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून यामध्ये सुद्धा नव्या जबाबदाऱ्यांबाबत त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे.
हेही वाचा-