ETV Bharat / state

मुंबईत 500 लसीकरण केंद्र सुरू होणार, लसीसाठी कंपन्यांसोबत बोलणी सुरू - मुंबई लसीकरण बातमी

मुंबईत महापालिकेकडून 500 लसीकरण केंद्र सज्ज आहेत. तसेच मुंबई महापालिकेला लस मिळावी म्हणून लस उत्पादक कंपन्यांसोबत चर्चा सुरू आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

लसीकरण
लसीकरण
author img

By

Published : Jun 15, 2021, 8:53 PM IST

Updated : Jun 15, 2021, 9:57 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेले पाच महिने लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकराने 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी महापालिकेकडून 500 लसीकरण केंद्र सज्ज आहेत. तसेच मुंबई महापालिकेला लस मिळावी म्हणून लस उत्पादक कंपन्यांसोबत चर्चा सुरू आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

माहिताी देताना अतिरिक्त आयुक्त

लसीचा तुटवडा

मुंबईमध्ये मार्च, 2020 पासून कोरोनाचा प्रसार सुरू आहे. हा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाची दुपारी लाट सुरू झाली. या लाटेदरम्यान कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याने नागरिकांनी लसीकरणाला गर्दी करण्यास सुरुवात केली. लसीकरण मोठ्या संख्येने होत असताना लस उत्पादक कंपन्यांकडून लसीचा पुरवठा कमी होत होता. यामुळे अनेक वेळा लसीकरण बंद ठेवावे लागले होते.

कंपन्यांसोबत चर्चा सुरू

मुंबईमध्ये लसीचा पुरवठा कमी होत असल्याने पालिकेने ग्लोबल टेंडर काढून 1 कोटी लसीचे डोस विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोणताही पुरवठादार त्यात पात्र ठरला नसल्याने ते ग्लोबल टेंडर रद्द करण्यात आले आहे. ग्लोबल टेंडर रद्द केले असले तरी पालिकेने लसीच्या उत्पादक कंपन्यांसोबत बोलणी सुरू ठेवली आहे. कंपन्यांकडून लस मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

500 लसीकरण केंद्र

मुंबईमध्ये सध्या लसीकरण करण्यासाठी पालिका, सारकारी आणि खासगी 300 लसीकरण केंद्र सुरू आहेत. ही लसीकरण केंद्र वाढवण्यात येत आहेत. मुंबईत आणखी 200 लसीकरण केंद्र वाढवून 500 लसीकरण केंद्र सुरू करणार आहोत. जास्त प्रमाणात लस आल्यास ती सर्व लसीकरण केंद्र सुरू केली जातील. लस जास्त प्रमाणात आली नाही तर काही लसीकरण केंद्र सुरू ठेवली जातील, असे काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा - कारवाईच्या इशाऱ्यानंतरही राजकीय बॅनरबाजी, महापालिकेची कारवाई सुरू

Last Updated : Jun 15, 2021, 9:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.