मुंबई- राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून कोरोना संदर्भात नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी समाज माध्यमांवर काही असामाजिक तत्त्व परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन समाजांमध्येही जातीय तेढ निर्माण करण्याचा व अफवा पसरविण्याचा प्रयत्न सध्या केला जात असल्यामुळे अशा समाज कंटकांच्या विरोधात राज्याच्या सायबर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात 560 गुन्ह्यांची नोंद झाली असून याप्रकरणी 290 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
लॉकडाऊन काळात राज्यभरात विवादास्पद व्हाट्स ॲप मेसेज, पोस्ट फॉरवर्ड केल्याप्रकरणी 210 गुन्हे , फेसबुक पोस्ट प्रकरणी 238 गुन्हे दाखल झाले असून, टिक टॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 28 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे चुकीचे मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी 18 गुन्हे दाखल झाले असून इंस्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्या प्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.ऑडिओ क्लिप आणि युट्युब सारख्या माध्यमांचा गैरवापर केल्याप्रकरणी 62 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हावार दाखल सायबर गुन्ह्यांची नोंद
परभणी 56 , पुणे ग्रामीण 48 , जळगाव 36 , मुंबई 33 , नाशिक ग्रामीण 20 , बुलढाणा 20 , ठाणे शहर 18 , कोल्हापूर 17 , सांगली 16 , सातारा 16 , जालना 14 , अहमदनगर 14 , नांदेड 13 , नवी मुंबई13 , नाशिक शहर 13 , ठाणे ग्रामीण 13 , पालघर 11 , नागपूर शहर 11 , लातूर 11 , अमरावती 11 , परभणी 9 , सिंधुदुर्ग 9 , हिंगोली 8 , चंद्रपूर 8 , पुणे शहर 7 , सोलापूर ग्रामीण 6 , रत्नागिरी 6 , भंडारा 5 , पिंपरी चिंचवड 5 , धुळे 5 , गोंदिया 5 , अमरावती ग्रामीण 5 , नागपूर ग्रामीण 4 , सोलापूर शहर4 , औरंगाबाद 4 , वर्धा 3 , रायगड 3 , अकोला 3 , वाशीम 2 , नंदुरबार 2 , उस्मानाबाद 2 , यवतमाळ 1 , औरंगाबाद ग्रामीण1