मुंबई - वडाळा येथे टाटा पॉवरच्या उच्च विद्युत प्रवाहामुळे भाजल्याने 5 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये 3 लहान मुले तर 2 महिलांचा समावेश आहे. त्यांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
हेही वाचा - पीएमसी बँक ग्राहकांचे न्यायालयाबाहेर आंदोलन; कॅन्सर पीडितेचाही समावेश
वडाळा येथील गणेश नगर, अष्टविनायक क्रीडा मंडळ, सॉल्ट पॅन रोड येथील रूम नंबर 353 मधील इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाले होते. घरावरून जाणाऱ्या टाटा पॉवरच्या उच्च विद्युत प्रवाहाची वायर या घरावरून जात असल्याने 5 जण झाले जखमी झाले. अग्निशमन दल जाण्याआधीच नागरिकांनी खासगी वाहनांनी जखमींना रुग्णालयात नेले.
हेही वाचा - वाहन उद्योगावर दसऱ्यातही मंदीची पडछाय ा; विक्रीत ५० टक्क्यांनी घसरण