ETV Bharat / state

मुंबईत सात महिन्यात साडे पाच हजारावर अतिरिक्त ऑक्सिजन खाटांची व्यवस्था - oxygen bed naagpur news

सध्या नागपुरातील कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन बेड्‌सची संख्या वाढविण्यात येत आहेत. बेड्‌सची उपलब्धता असली तरी ऑक्सिजनची व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या बेड्‌सचा उपयोग नाही.

नागपूर महापौर
नागपूर महापौर
author img

By

Published : Apr 27, 2021, 9:17 PM IST

नागपूर:- शहरात कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोविड रुग्णांची संख्या प्रचंड वाढली होती. तेव्हा नागपूर शहरात सरकारी आणि विविध खासगी रुग्णालय मिळून केवळ १५१४ खाटांची व्यवस्था होती. सप्टेंबरनंतर आता एप्रिल २०२१मध्ये कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा उच्चांक गाठला आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाने उद्‌भवू शकणारी परिस्थिती लक्षात घेऊन खाटांची संख्या वाढवल्याचा दावा महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. या सात महिन्यांच्या काळात सुमारे साडे पाच हजारांनी खाटा वाढल्याने नागपूरात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील बेडसंख्या ७१४४ इतकी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

खाटांच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ

२८ सप्टेंबर २०२०मध्ये केवळ १५१४ बेड्‌स विविध रुग्णालयात उपलब्ध होते. त्यामध्ये ऑक्सिजनची उपलब्धता असलेले ११४४, आय.सी.यू.मध्ये ३१६ तर व्हेंटिलेटर सपोर्ट असलेले २३६ बेड्‌स उपलब्ध होते. यानंतर प्रत्येक महिन्यात ही खाटांची संख्या टप्याटप्याने वाढविण्यात आली. ३१ डिसेंबर २०२० रोजी ३९९३ बेड्‌स रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आले. त्यात ऑक्सिजनसह २६७३, आय.सी.यू.मध्ये १२०८ तर व्हेंटिलेटर असलेल्या ३४९ बेड्‌सचा समावेश होता. ३१ जानेवारी २०२१ रोजी एकूण बेड्‌सची संख्या ३९१० झाली. तसेच २८ फेब्रुवारी रोजी ३९१३, बेड्‌स ३१ मार्च रोजी ४६८२ बेड्‌स, १२ एप्रिल रोजी ५५५३ बेड्‌स तर १८ एप्रिल रोजी ६३८७ बेड्‌स उपलब्ध झाले. २४ एप्रिल रोजी एकूण बेड्‌सची संख्या ७१४४ इतकी झाली आहे. अर्थात सप्टेंबर २०२०नंतर ५६३० बेड्‌स वाढविण्यात आले आहेत. सध्या नागपूर शहरात ४६५३ बेड्‌स ऑक्सिजनसह असून २११३ बेड्‌स आय.सी.यू.चे आहेत. ५४२ बेड्‌स व्हेंटिलेटर्सचे आहेत. ही संख्या पुन्हा वाढणार असून यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

आरोग्यसेवा देण्यासाठी पराकाष्ठा
सध्या नागपुरातील कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन बेड्‌सची संख्या वाढविण्यात येत आहेत. बेड्‌सची उपलब्धता असली तरी ऑक्सिजनची व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या बेड्‌सचा उपयोग नाही. ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा ऑक्सिजन टँकर उपलब्ध केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने व्हेंटिलेटर्सचीही व्यवस्था करण्यात येत आहे. संपूर्ण प्रशासन कामाला लागले असून उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत. नागरिकांनीही यात संयमाची भूमिका ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.