ETV Bharat / state

First World Marathi Conference : मुंबईत चार जानेवारीपासून पहिले विश्व मराठी संमेलन; मराठी संस्कृतीचा उत्सव  होणार साजरा - मराठी संस्कृतीचा उत्सव

मराठी भाषा संस्कृती ( First World Marathi Conference ) कला साहित्य उद्योग आणि पाककृती अशा विविध पैलूंना स्पर्श करणारे पहिले विश्व मराठी संमेलन येत्या 4 जानेवारीपासून मुंबईत होणार आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर ( Marathi Language Minister Deepak Kesarkar ) यांनी दिली. तसेच या संमेलनात महाराष्ट्र बाहेरून आणि देशाबाहेरून मराठी वर प्रेम करणारे अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (World Marathi Conference in Mumbai )

First World Marathi Conference
मुंबईत चार जानेवारीपासून पहिले विश्व मराठी संमेलन
author img

By

Published : Jan 3, 2023, 8:50 AM IST

मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

मुंबई : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे ( First World Marathi Conference in Mumbai ) चार ते सहा जानेवारी दरम्यान मुंबईतील वरळी येथील क्रीडा संकुलात विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. इतक्या भव्य पातळीवर मराठी संस्कृतीचा उत्सव साजरा (Celebration of Marathi culture ) करणार हे संमेलन प्रथमच होत आहे. (World Marathi Conference in Mumbai) जगभरातील मराठी भाषकांनी एकत्र यावे मराठीची गोडी वाढावी मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा या हेतूने हे संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर ( Marathi Language Minister Deepak Kesarkar ) यांनी दिली.

मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणार : लुप्त होत चाललेली वाद्य संस्कृती खाद्य संस्कृती वस्त्र संस्कृती यांचा सादरीकरण तसंच साहित्य कला संगीत या सर्व सांस्कृतिक रंगांचा पराभव घेणे हा सुद्धा या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे या निमित्ताने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वादही उपस्थितांना मिळणार आहे संमेलनाच्या तीनही दिवशी मराठीचा झेंडा अटकेपार हा विशेष कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात साता समुद्रा पार जाऊन मराठी जतन करणारे मराठी भाषेसाठी काम करणारे परदेशातील मान्यवर आपले अनुभव सांगणार आहे या सत्रात सहभागी व्यक्ती या लंडन, अमेरिका, दुबई, नायजेरिया अशा विविध ठिकाणाहून सुमारे पाचशे आठ मान्यवरांनी नोंदणी केल्याची माहिती केसरकर यांनी दिली. (First World Marathi Conference )

First World Marathi Conference
मुंबईत चार जानेवारीपासून पहिले विश्व मराठी संमेलन

संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन : संमेलनाच्या तीनही दिवशी सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला आहे पहिल्या दिवशी चार जानेवारी रोजी लेझीम पथक ढोल ताशा पथक मर्दानी खेळ यांच्या साथीने मोठ्या जल्लोषात संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर निमंत्रितांचे स्वागत मराठमोळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे. या सत्रात नचिकेत देसाई, केतकी भावे, जोशी माधुरी, करमरकर मंगेश बोरगावकर, श्रीरंग भावे हे गायक कलाकार काही अजरामर मराठी गाणी सादर करतील. त्यानंतर रंग कलेचे हा वंदना गुप्ते, निना कुलकर्णी, शिवाजी साटम, अशोक पत्की अशा सिने नाट्यसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम होणार आहे. तसेच लेखिका संजीवनी खेर, प्रकाशक हर्ष भटकळ, लेखक ऋषिकेश गुप्ते या साहित्यिकांच्या सहभागात मराठी भाषा काल आज उद्या हा परिसंवाद राहणार आहे. उपसभापती नीलम गोरे या परिसंवादाच्या अध्यक्ष असतील तर श्रेया बुगडे संचालन करणार आहेत.

संमेलनात नामवंतांचा सहभाग : या संमेलनात विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचा मराठमोळा फॅशन शो होणार आहे यात लेखिका पटकथाकार मनीषा कोरडे भाषा तज्ञ अमृता जोशी झी स्टुडिओच्या वैष्णवी कानविंदे, क्रीडा प्रशिक्षक नीता ताटके, दिग्दर्शिका समृद्धी पोरे, लँडस्केप डिझायनर असीन गोकर्ण, एडवोकेट दिव्या चव्हाण, व्यावसायिक सुप्रिया बडवे, चित्रकार शुभांगी सामंत अशा महिलांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री संविधान गुरु करणार आहे. मराठी भावगीत, भक्ती गीत, नाट्य संगीत यांची मैफल या कार्यक्रमात असणार आहे. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके, अशा खाडीलकर, उत्तरा केळकर यांच्यासह उर्मिला धनगर, वैशाली माडे आदी कलावंत सहभागी होणार आहेत.

उद्योजकांशीही या संमेलनात चर्चा : उद्योजकांशीही या संमेलनात चर्चा होणार असून यामध्ये गिरीश चितळे हे चितळे डेअरीचे तर उज्वला हावरे हावरे बिल्डरच्या उद्योजिका असणार आहेत. भारता बाहेरील मराठी उद्योजक जर्मनीतील ओमकार कलवडे, संनफ्रान्सिसकोतील प्रकाश भालेराव हे सुद्धा सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती आणि वाद्य संस्कृती या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. तसेच मराठी भाषेचे सौंदर्य आणि तिचे विविध पैलू ही या कार्यक्रमात उलगडणार असल्याची माहिती मंत्री केसरकर यांनी दिली. याशिवाय प्रसिद्ध कलाकार ऐश्वर्या नारकर पुष्कर्षत्री आनंद इंगळे, गिरिजा ओक, अनिरुद्ध जोशी चित्रकार सुहास बहुलकर, अभिनेते संजय मोने, नेमबाज अंजली भागवत, आयटी तज्ञ अच्युत गोडबोले आणि संस्कृती बालगुडे सुद्धा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.