ETV Bharat / state

चेंबूर नाका येथील सिद्धार्थ कॉलनीत महिला मतदारांचा सत्कार करून मतदान सुरू - mumbai

सखी बुथमध्ये सर्वप्रथम शैलजा सावंत यांनी मतदान केले आहे. यामुळे महिलांनी सावंत यांची आरती ओवाळून हळदी-कुंकू लावून त्यांचे स्वागत केले

महिला मतदारांचा सत्कार करून मतदान सुरू
author img

By

Published : Apr 29, 2019, 9:24 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला मुंबईमध्ये सुरुवात झाली आहे. यासाठी चेंबूर नाका परिसरातील सिद्धार्थ कॉलनी येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १ वरती ६ बुथ तयार करण्यात आले असून त्यात महिलांसाठी खास सखी बुथही आहे.

सखी बुथमध्ये सर्वप्रथम शैलजा सावंत यांनी मतदान केले आहे. यामुळे महिलांनी सावंत यांची आरती ओवाळून हळदी-कुंकू लावून त्यांचे स्वागत केले, यानंतर त्यांनी आपले मत नोंदवले. त्यांना सखी बुथ केंद्रातर्फे कोकम सरबत बॉटल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. मतदान केल्यानंतर सावंत यांनी आपल्या भावना ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केल्या. मला फार आनंद वाटला आणि प्रत्येक महिलांनी मतदान करण्यासाठी केंद्रावर यावे आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.

Intro:17 व्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला मुंबईमध्ये सुरुवात झाली आहे चेंबूर नाका परिसरातील सिद्धार्थ कॉलनी येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक एक वरती सहा बूथ तयार करण्यात आले आहेत त्यात महिलासाठी खास सखी बूथ त्यावर करण्यात आला आहे.

Body:सखी बूथ मध्ये सर्वप्रथम मतदान शैलजा सावंत यांनी केले आहे सावंत यांची महिलांनी आरती ओवाळून हळदीकुंकू लावून त्यांची त्यांचे स्वागत केले आणि स्वागत करून त्या मतदान करण्यासाठी सज्ज झाल्या त्यांना सखी बुत केंद्रातर्फे कोकम सरबत बॉटल देऊन शुभेच्छा दिले आहे. आणि त्यांनी मतदान करून आल्यानंतरआपल्या भावना इटीव्ही भारत ला दिल्या मला फार आनंद वाटला आणी प्रत्येक महिलांनी मतदान करण्यासाठी केंद्रावर आवश्यक यावे आणि आपला मतदान हक्क बजावले पाहिजे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.