ETV Bharat / state

विरोधकांनी लावलेल्या आरोपांबाबत सचिन वझेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सचिन वझे यांच्या त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत विचारणा केल्यास नेमके आरोप काय झाले आहेत ते पाहतो त्यानंतर उत्तर देतो, अशी प्रतिक्रिया सचिन वझे यांनी दिली आहे.

Sachin waze
सचिन वझे
author img

By

Published : Mar 9, 2021, 7:17 PM IST

Updated : Mar 9, 2021, 7:46 PM IST

मुंबई- विधानसभेत मनसुख हिरेन प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळाले. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वझे त्यांच्यावर आरोप करत वझे यांच्या राजीनाम्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही मागणी उचलून धरत विरोधकांनी सभागृहात गोंधळ केला. याचे पडसाद मुंबई पोलीस दलात पाहायला मिळाले. दिवसभरात सलग तिसऱ्यांदा सचिन वझे हे आयुक्तांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत त्यांना विचारणा केल्यास नेमके आरोप काय झाले आहेत ते पाहतो त्यानंतर उत्तर देतो, अशी प्रतिक्रिया सचिन वझे यांनी दिली आहे.

दिवसभरातील घटनाक्रम

सभागृहात सकाळच्या सत्रात देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवला. यानंतर विरोधकांनी सचिन वझे यांच्या राजीनाम्याची मागणी करत सभागृहात गदारोळ केला. तर त्याच सुमारास मुंबई आयुक्त कार्यालयाच्या नव्या इमारतीतील चौथ्या मजल्यावर सचिन वझे यांचे दालन आहे. ते याच दालनातून बाहेर निघाले आणि सुमारे दीड ते दोन तास आयुक्त कार्यालयाच्या बाहेर होते. मात्र, जेव्हा ते पुन्हा कार्यालयात परतले तेव्हा त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. काही काळ भेट झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या दालनात परतले. पुन्हा संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्तांची सचिन वझे यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वझे हे तिसऱ्यांदा आयुक्तांच्या भेटीला गेले आहेत.

प्रतिक्रिया देताना वझे

हेही वाचा - फडणवीस सरकारमुळेच मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात - अशोक चव्हाण

हेही वाचा - विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेस आग्रही

Last Updated : Mar 9, 2021, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.