मुंबई- साकीनाका परिसरात असलेल्या आशापुरा कंपाउंडमध्ये संध्याकाळी 5.20 वाजेच्या दरम्यान थिनर रासायनिक कंपनीला मोठी आग लागली. शर्थीच्या प्रयत्नाने आग विझवण्याचे काम चालू आहे. आग लवकरच नियंत्रणात येईल, असे अग्निशमन दलाचे अधिकारी के.व्ही. हिवराळे यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले.
हेही वाचा-साकीनाक्यात पुन्हा भीषण अग्नितांडव; 30 ते 35 दुकाने जळाली
खैरानी येथे आग लागलेल्या तिन्ही बाजूनी वॉटर टँकर व फोमचा मोठा मारा करण्यात येत आहे. आग लागलेल्या ठिकाणी केमिकल, लाकडी सामान, गारमेंटचे दुकान आणि गोदाम आहेत. ही आग विझवण्यासाठी 25 च्या वर इंजिन, टँकर ,जम्बो टँकरने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करत आहेत. आग लागलेल्या 3 बाजूंनी पाण्याचा आणि फोमचा मारा करण्यात येत आहे. या ठिकाणी असलेल्या दुकानाच्या गोदामाच्या भिंती जेसीबीच्या मदतीने पाडण्यात येत आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी के. व्ही हिवराळे स्वतः हजर आहेत. 1 तासात ही आग नियंत्रणात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.