मुंबई - घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील टॉप टेन मोबाईल दुकानाला आज दुपारी अडीच वाजता भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपये किमतीचे मोबाईल जळून खाक झाले. दुकानापासून काही अंतरावरच घाटकोपर मेट्रो स्थानक आणि रेल्वे स्थानक असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून परिसरातील गर्दी कमी केली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीत दुकान मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुकानाच्या काही अंतरावर घाटकोपर मेट्रो स्थानक पूल आणि रेल्वे स्थानक असल्याने गर्दी जास्त होती. अग्निशमन दलाच्या ६ बंबांनी ही आग आटोक्यात आणली.
दुकानात ६ वातानूकुलिन यंत्रे चालू होते. त्यामुळे शॉर्टसर्किट झाले असावे, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या परिसरात कायमच वर्दळ असते. त्यात बेस्ट बस थांबा ही जवळच असल्याने नागरिकांची गर्दी होती. यावेळी प्रत्यक्षदर्शी शरद भावे यांनी सांगितले की, अग्निशामक दल उशिरा आल्यामुळे आग भडकली आणि त्यात दुकानातील सर्व माल जळून खाक झाला.