मुंबई - बोरिवली पश्चिममधील देवकी नगर परिसरातील चिंतन गार्डनजवळ सकाळी नऊच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. सद्यस्थितीत अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात सजावटीची दुकाने आहेत. या दुकानातील लाकडी बांबूसह कपड्याचे साहित्य जळून खाक झाले. अद्यापपर्यंत आगीचे कारण अस्पष्ट आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
(सविस्तर बातमी थोड्याच वेळात )