ETV Bharat / state

मुलुंडमध्ये गॅस पाईपलाइन फुटल्याने लागली आग, जीवितहानी नाही

आज(शुक्रवार) दुपारी बाराच्या सुमारास मुलुंडच्या भक्तिमार्ग परिसरात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याच्या पाइप लाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, गॅस पाइपलाइन फुटून झालेल्या गळतीमुळे आग लागली. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली, या घटनेत कोणीही जखमी नाही.

मुलुंडमध्ये खोदकामादरम्यान गॅस पाईपलाइन फुटल्याने आग लागली

author img

By

Published : Jan 24, 2020, 7:34 PM IST

मुंबई - मुलुंडच्या भक्तिमार्ग परिसरामध्ये खोदकामादरम्यान महानगरची गॅस पाईपलाईन फुटली. त्यामुळे गॅसची गळती होऊन त्या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणीही जखमी नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

मुलुंडमध्ये खोदकामादरम्यान गॅस पाईपलाइन फुटल्याने आग लागली

आज (शुक्रवार) दुपारी बाराच्या सुमारास मुलुंडच्या भक्तिमार्ग परिसरात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, एका कर्मचाऱ्याकडून पाइपलाइनचे काम करताना महानगर गॅसचा पाईप कापला गेला. त्याचवेळी दुसरा कर्मचारी त्याठिकाणी वेल्डिंग काम करत होता. वेल्डिंग करताना निघालेल्या ठिणग्या या एलपीजी गॅसच्या संपर्कात आल्याने आगीचा मोठा भडका उडाला. ज्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र, रस्त्याच्या कडेला असलेले झाड या आगीच्या विळख्यात सापडले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गॅस पुरवठा खंडित करून ही आग तासाभरात आटोक्यात आणली.

हेही वाचा - मुंबईत वंचित आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद; उपनगरात बसवर दगडफेक

सध्या शहरात विविध विकासकामांच्या निमित्ताने रस्ते खोदकाम केले जात आहे. या दरम्यान वारंवार गॅस पाइपलाइन फुटून दुर्घटनेचे प्रमाण वाढत आहेत. याकडे महापालिकेच्या गॅस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गॅसच्या पाइपलाइन या रस्त्यावरून गेल्या असल्यामुळे पालिकेकडून खोदकाम करण्यापूर्वी खबरदारी घेण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - भाजप सरकारकडून उद्धव ठाकरे, पवार, राऊतांचे फोन टॅप? गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Intro:मुलुंड मध्ये महानगर गॅस पाईप लाइन खोदकाम दरम्यान फुटून आग लागली कोणतीही जीवितहानी नाही

मुलुंडच्या भक्तिमार्ग परिसरामध्ये महानगर गॅस पाईपलाईन खोदकाम दरम्यान फुटून एलपीजी गॅस ची गळती झाल्याने आग लागली यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणली या घटनेत कोणीही जखमी नाहीBody:मुलुंड मध्ये महानगर गॅस पाईप लाइन खोदकाम दरम्यान फुटून आग लागली कोणतीही जीवितहानी नाही

मुलुंडच्या भक्तिमार्ग परिसरामध्ये महानगर गॅस पाईपलाईन खोदकाम दरम्यान फुटून एलपीजी गॅस ची गळती झाल्याने आग लागली यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणली या घटनेत कोणीही जखमी नाही.

आज दुपारी बाराच्या सुमारास पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याच्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम सुरू होते .त्याचवेळी एका कर्मचाऱ्याकडून पाईपलाईनचे काम करताना महानगर गॅसच्या पाईप कापला गेला त्याच वेळी दुसरा कर्मचारी त्याठिकाणी वेल्डिंग काम करत होता .वेल्डिंग करताना निघालेल्या ठिणग्या या एलपीजी गॅसच्या संपर्कात आल्या आणि आगीचा मोठा भडका उडाला ज्यामध्ये कुठलीही जीवित हानी जरी झाली नसली तरी रस्त्याच्या कडेला असलेले झाड या आगीच्या विळख्यात आले आणि जळाल. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गॅस पुरवठा खंडित करून ही आग तासाभरात आटोक्यात आणली . सध्या शहरात विविध विकासकामांच्या निमित्ताने रस्ते खोदकाम केले जात असून प गॅसच्या पाइपलाइन या रस्त्यावरून गेल्या असल्यामुळे पालिकेकडून खोदकाम करण्यापूर्वी खबरदारी घेण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
byte : पप्पू जोशी स्थानिक नागरिक मुलुंडConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.