मुंबई: भायखळा मुस्तफा बाग परिसरातील ग्लोरिया कॉन्व्हेंट स्कुल जवळील एका लाकडाच्या गोदामाला पहाटे ६ च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, पालिका आणि बेस्ट कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत.
आग लागलेल्या गोदामाच्या बाजूला दाटीवातीचा परिसर असल्याने आग पसरुनये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत होती. आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणिही जखमी झालेले नाही. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.