ETV Bharat / state

Nagpur Threat Call: अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याच्या धमकी कॉल प्रकरणी गुन्हा दाखल - मेगास्टार अमिताभ बच्चन

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, मेगास्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नागपूर पोलीस नियंत्रण कक्षात आलेल्या कॉलवर अज्ञात इसमाने मुंबईतील दादर परिसरात 25 शस्त्रधारी लोक आले आहे, अशी खळबळजनक माहिती दिल्याचे देखील उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur Threat Call
नागपूर पोलीस नियंत्रण कक्ष
author img

By

Published : Mar 2, 2023, 7:07 AM IST

मुंबई : नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला काल एका अज्ञात कॉलरने फोन करून मुकेश अंबानी, अमिताभ आणि धर्मेंद्र यांच्या घरी बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी संबंधित ठिकाणी सुरक्षा वाढवली. दादर मुंबई येथे 25 शस्त्रधारी लोक आले आहेत. ते दहशतवादी घटना घडवून आणणार आहे, अशी अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलीस नियंत्रण कक्षास फोनवर माहिती दिली. दादरमधील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी भारतीय दंड संविधान कलम ५०५(१), ५०६(२) १८२ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी कॉल करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

काल आला होता कॉल : नागपूर पोलीस नियंत्रणाला मुंबईतील प्रतिष्ठित लोकांच्या घरी बॉम्बस्फोट करणार असल्याचा फोन अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाला. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. तसेच अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घरी आणि बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्र यांच्या घरीही बॉम्बस्फोट होणार असल्याचे कॉलरने सांगितले. मुंबई पोलिसांनी या फोनबाबत माहिती मिळताच कॉल करणाऱ्या कॉलरचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि मुकेश अंबानी ही मुंबईतील प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असे व्यक्ती आहेत. त्या अनुषंगाने कॉलरला शोधण्यासाठी मुंबई पोलीस आणि इतर तपास यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मुंबई पोलिसांना अज्ञात कॉलरच्या फोन कॉलनंतर नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाने ही माहिती दिली. त्यांनतर मुंबई पोलिसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवली. तातडीने कॉलरचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

झेड प्लस सुरक्षा कवच मिळावे : दरम्यान, मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च झेड प्लस सुरक्षा कवच मिळावे असा, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर, कथित बॉम्बची धमकी आणि अब्जाधीश कुटुंब अंबानींना झेड प्लस सुरक्षा पुरवल्याबद्दल अनेक सोशल मीडियावर युजर्सनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने पावले उचलली आहे. पुढील तपास सुरू आहे. मुंबई पोलीस याप्रकरणी सतर्क आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईवर हल्ला होण्याचा मेल देखील प्राप्त झाला होता. त्यामुळे मुंबईत सध्या अतिशय भीतीदायक वातावरण असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : Telangana Suicide News : सिनीयरला कंटाळून मेडिकल विद्यार्थीनीची आत्महत्या, तर फोटो व्हायरल केल्याने इंजिनिअरिंग विद्यार्थीनीने संपवले जीवन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.