ETV Bharat / state

Kurla Carshade Scam : कुर्ला कारशेड येथील 8 अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल; गैर पद्धतीने निविदा दिल्याचा आरोप - Fir Registered Against 8 Kurla Carshade officer

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने मुंबईतील विद्याविहार येथील स्टोअर्स डेपो (Vidyavihar Store Depot ) आणि कुर्ला कारशेड येथे नियुक्त केलेल्या मध्य रेल्वेच्या 8 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हेगारी कट रचल्याचा आणि त्यांच्या अधिकृत पदांचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे.

Kurla Carshade Scam
Kurla Carshade Scam
author img

By

Published : Feb 15, 2022, 3:37 AM IST

मुंबई - केंद्रीय अन्वेषण ब्युरोने मुंबईतील विद्याविहार येथील स्टोअर्स डेपो ( Vidyavihar Store Depot ) आणि कुर्ला कारशेड ( Kurla Carshade Scam ) येथे नियुक्त केलेल्या मध्य रेल्वेच्या 8 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हेगारी कट रचल्याचा आणि त्यांच्या अधिकृत पदांचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. खासगी कंपन्यांच्या बेकायदेशीर आर्थिक फायद्यासाठी आरोपी अधिकार्‍यांवर अधिकृत पदाचा गैरवापर, गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, विश्वासार्हतेचा भंग या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीबीआयच्या माहितीनुसार त्यांना मिळालेल्या माहितीनुसार विद्याविहार स्टोअर्स डेपो आणि कुर्ला कार शेड येथे लोकल ट्रेन रेकच्या देखभालीसाठी वापरल्या जाणार्‍या विविध भाग वस्तूंच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रियेच्या बाबतीत, अस्पष्टता काही विशिष्ट निविदा अंतर्गत पार्टस आणि अन्य सामान हे आरोपी खरेदी करत, असे तपासात समोर आले आहे.

आरोपी कंत्राट काही कॉन्ट्रॅक्टर वगळता इतर काँट्रॅक्टरना समजू मिळू नये, याची काळजी घ्यायचे. बहुतेक खरेदी ऑर्डर्सच्या विरोधात विद्याविहार स्टोअर डेपोमधील निविदा 2017-18, 18-19 आणि 19-20 या तीन आर्थिक वर्षांमध्ये काही खास विशिष्ट कंपन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट देण्यात आल्या आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पडताळणी होऊ नये आणि त्यांच्यापर्यंत गोष्टी जाऊ नये, याची काळजी घेत. बहुतेक खरेदी ऑर्डर्स हेतुपुरस्सर 2.5 लाख रुपयांच्या खाली ठेवण्यात आल्या होत्या आणि अधिक पडताळणी टाळण्यासाठी हे हेतुपुरस्सर करण्यात आले होते. केंद्राच्या दक्षता विभागाच्या अंतर्गत चौकशीत स्पष्ट झाले की तुलनेने पट जास्त दराने वस्तू खरेदी केल्या गेल्या आहे, अशी खरेदी कथितरित्या 22.60 कोटी रुपयाचा गैरव्यवहार आढळून आल्या असल्याचे तपासात दिसून येत आहे. या प्रकरणात 12 ठिकाणी झडती घेण्यात आली. ज्यामुळे प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली.

हेही वाचा - Goa Election 2022 : गोव्यात मतदान शांततेत; पोस्टल मतांसह एकूण 78.94 टक्के मतदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.