ETV Bharat / state

लॉकडाऊन दरम्यान मुंबईत 16 हजार 145 आरोपींवर गुन्हे दाखल

लॉकडाऊन काळामध्ये कलम 188 नुसार मुंबईतील दक्षिण मुंबईत 926 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मध्य मुंबईत 2 हजार 33 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पूर्व मुंबई तब्बल 1 हजार 286 गुन्हे दाखल झाले आहेत.

mumbai police
लॉकडाउन दरम्यान मुंबईत 16 हजार 145 आरोपींवर गुन्हे दाखल
author img

By

Published : Jun 19, 2020, 11:55 AM IST

Updated : Jun 19, 2020, 7:35 PM IST

मुंबई - वाढत्या कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात पाचवा लॉकडाऊन 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. पोलिसांकडून शहरात कलम 144 लागू करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 2 हजार 476 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

20 मार्च ते 18 जून या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी कलम 188 चे उल्लंघन करणाऱ्या 7 हजार 903 प्रकरणात तब्बल 16 हजार 145 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणार्‍या 2 हजार 84 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून, तब्बल 4 हजार 338 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तसेच 9 हजार 723 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिले आहे.

लॉकडाऊन काळामध्ये कलम 188 नुसार मुंबईतील दक्षिण मुंबईत 926 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मध्य मुंबईत 2 हजार 33 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पूर्व मुंबई तब्बल 1 हजार 286 गुन्हे दाखल झाले आहेत. पश्चिम मुंबईत 1 हजार 920 तर उत्तर मुंबईत 1 हजार 738 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भात, विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी , सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.

Last Updated : Jun 19, 2020, 7:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.