ETV Bharat / state

Mumbai Crime : नवाब मलिकांच्या मुलाविरुद्ध कुर्ला पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल - बनावट कागदपत्रे

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट व्हिसा प्रकरणी फराज मलिकवर कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फराज मलिकवर व्हिसा अर्जासाठी बनावट कागदपत्रे दिल्याचा आरोप आहे.

Nawab Maliks Son Faraz Malik
नवाब मलिकांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
author img

By

Published : Jan 18, 2023, 2:44 PM IST

मुंबई : काल रात्री मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात फराज मलिकविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी आयपीसी कलम 420, 465, 468, 34 आणि परदेशी कायदा 1946 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही बाब २०१९ सालची आहे, तेव्हापासून तपास सुरू होता. यामध्ये तक्रारदार हे एसबी १ चे पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. फराज मलिक किंवा अन्य आरोपींना अद्याप चौकशीसाठी बोलावलेले नाही.

भाजप नेत्याने ट्विट करून टोला लगावला : भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करून फराज मलिक यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, जे इतरांबाबत खोटे बोलतात ते स्वतःच खोटे असतात. अधिक माहिती देताना त्यांनी लिहिले की, मुंबई पोलिसांनी नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्याविरुद्ध फ्रेंच रहिवासी असलेल्या दुसरी पत्नी हमलीनच्या व्हिसा अर्जासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.

नेमके काय प्रकरण काय : फराज नवाब मलिक यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा करण्यात आला आहे. या महिलेचे नाव लॉरा हॅमलिन असल्याचे समोर आले आहे. लॉराने ज्या फ्रेंच रहिवासी आहेत. भारतीय व्हिसासाठी त्यांनी कागदपत्रे दाखल केली होती. त्यासाठी त्यांनी फराज मलिकांसोबत लग्न झाल्याचे खोटी कागदपत्रे दाखल केली होती. मात्र याप्रकरणी चौकशी केली असता ते सर्व खोटे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे काल रात्री खोटे लग्नाचे दाखले देत व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मलिकांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

व्हिसासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याचा आरोप : कुर्ला पोलिस स्टेशनच्या मुंबई स्पेशल क्राईम ब्रॅंच 2 यांच्याकडे बनावट व्हिसासंदर्भात प्रकरणे येतात. त्यांच्या तक्रारीवर कुर्ला पोलिसांच्या छाननीमध्ये मलिक यांचे नाव आहे. त्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​​​​​फराज नवाब मलिक यांच्या दुसऱ्या पत्नीच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांकडून नवाब मलिकांच्या मुलासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Nawab Malik नवाब मलिक यांचा जामीनावर वेळेअभावी सुनावणी नाहीच या दिवशी होणार पुढील सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.