मुंबई - आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबई दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. दरम्यान त्या आपल्या या आजच्या दौऱ्यामध्ये वेगवेळ्या उद्योगपतींची भेट घेऊन, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या भेटीनंतर सीतारामन पत्रकार परिषद घेणार आहेत.
अर्थसंकल्पानंतर पहिलाच मुंबई दौरा
एक फेब्रुवारीला निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला होता, त्यानंतर त्या पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींबाबत त्या बोलणार असल्याची चर्चा आहे. मात्र आपल्या या दौऱ्यात त्या नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.