मुंबई - मनसुख हिरेन प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली करण्यात आली आहे. आपण क्राईम ब्रांच मधून मुक्त झालो आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच अधिक काही न बोलता त्यांनी नव्या जबाबदारीवर त्यांनी मौन बाळगले आहे.
हेही वाचा - मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमधून बाहेर काढणाऱ्याचा एटीएसने घेतला जवाब
मनसुख हिरेन प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वझे यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती. दरम्यान, विधानसभेत गृहमंत्र्यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती. त्यानंतर आज सचिन वाझे यांची मुंबई पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्र विभागात बदली करण्यात आली आहे.
एकाच दिवसात दुसऱ्यांदा बदली -
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेच्या सभागृहात माहिती दिली होती. त्यानुसार पोलीस अधिकारी सचिन वझे यांची पोलीस नियंत्रण कक्षाच्या विभागात बदली करण्यात आली होती. सभागृहात माहिती दिल्या प्रमाणे सचिन वझे यांची बदली करण्यात आली आहे. वझे यांना गुन्हे शाखेतून हटवून नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले आहे. मात्र, वझे यांची ही बदली तात्पुरत्या स्वरुपाची आहे, असे सांगण्यात आले होते.