ETV Bharat / state

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत नव्याने फेरविचार, २० जूनला होणार आढावा बैठक

राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि संलग्न असलेल्या महाविद्यालयातील ३२ लाख विद्यार्थ्यांपैकी २५ लाख विद्यार्थ्यांच्या यावर्षीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार असून या विद्यार्थ्यांची संख्या ही सुमारे ७ ते ८ लाख इतकी आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत २० जून रोजी आढावा घेण्यात येईल. यावेळी परीक्षांचा फेरविचार केला जाईल.

Higher and Technical Education Minister Uday Samant
अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत नव्याने फेरविचार
author img

By

Published : May 12, 2020, 7:32 AM IST

मुंबई - कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील अंतिम वर्षांच्याच परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तर उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याविषयी अनेक प्रकारच्या तक्रारी आल्याने यावर फेरविचार केला जाणार आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, राज्यातील अकृषी विद्यापीठातील कुलगुरू आणि संबंधित अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक २० जून रोजी घेतली जाणार आहे.

राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि संलग्न असलेल्या महाविद्यालयातील ३२ लाख विद्यार्थ्यांपैकी २५ लाख विद्यार्थ्यांच्या यावर्षीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार असून या विद्यार्थ्यांची संख्या ही सुमारे ७ ते ८ लाख इतकी आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत २० जून रोजी आढावा घेण्यात येईल. यावेळी फेरविचार करु पण आता अभ्यास करा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

उदय सामंत यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून जोपर्यंत कोणतीही स्पष्ट सूचना येत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांनी परीक्षा आहेत, असे समजूनच घरी राहून शांतपणे अभ्यास करावा. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागतील हे यूजीसीचे म्हणणे आहे, असे सावंत म्हणाले. कोरोनाच्या पाश्वभूमीवर पुन्हा एकदा समितीची बैठक होणार आहे. यावेळी आढावा होणार आहे.

नवीन शैक्षणिक सत्र ऑगस्टपासून ?

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना इतके सांगू शकतो की, उच्च व तंत्र शिक्षण अभ्यासक्रमांच्या परीक्षा या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच होतात. त्यामुळे, त्यांच्या मार्गदर्शन आणि नियमानुसारच आम्ही या परीक्षा घेणार आहोत, असे सावंत म्हणाले. सोबतच नवे शैक्षणिक सत्र ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.

जुलै महिन्यात होणार परीक्षा

राज्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा जुलै महिन्यात घेतल्या जाणार असून त्यासाठीचे नियोजन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला या परीक्षांमुळे धोका आहे आणि ते बाधित होऊ शकतात असे वाटल्यास आम्ही त्यावेळी विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ आणि या परीक्षांचादेखील फेरविचार करू. सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि भावनांशी खेळणार नाही, अशी ग्वाहीही उदय सामंत यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना यावेळी दिली.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.