मुंबई - कामगार संघटना, चित्रपट आणि मालिका निर्माते, प्रसारणकर्ते यांच्यात सुरू असलेला वाद अखेर निवळल्याने मुंबईत सर्व प्रकारचे चित्रीकरण सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर प्रेक्षकांची रिपीट एपिसोडच्या माऱ्यातून सुटका होणार आहे.
इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर कौन्सिल, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज असोसिएशन आणि इंडियन टीव्ही अँड फिल्म ऍक्टर्स असोसिएशन म्हणजे सिंटा यांच्यात आज व्हर्चुअली झालेल्या बैठकीत अखेर वादावर तोडगा काढण्यात आला. कामगार संघटनाच्या मागणीनुसार प्रत्येक कामगाराचा २५ लाखांचा जीवनविमा आणि २ लाखांचा वैद्यकीय खर्च द्यायला निर्मात्यांनी होकार दिल्याने त्यांचे याबाबत समाधान झाले. हा नियम सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांना लागू असेल. याशिवाय पुढील तीन महिन्यांसाठी कलाकार आणि तंत्रज्ञ याना ९० दिवसांऐवजी ३० दिवसांनी त्यांचा मोबदला दिला जाईल, ही मागणी देखील निर्मात्यांनी मान्य केली. याशिवाय प्रत्येक मालिका आणि सिनेमाच्या सेटवर राज्य सरकारने चित्रीकरणासाठी परवानगी देताना घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन होईल याची तयारी या सर्व संघटनानी दाखवली. त्यामुळे आता लवकरात लवकर मुंबईत मालिका आणि चित्रपटांचे खोळंबलेले चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अखेर कामगार संघटना अन् निर्माते यांच्यातील वाद मिटला, मुंबईत चित्रीकरणाचा मार्ग मोकळा - mumbai serial shooting
इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर कौन्सिल, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज असोसिएशन आणि इंडियन टीव्ही अँड फिल्म ऍक्टर्स असोसिएशन म्हणजे सिंटा यांच्यात आज व्हर्चुअली झालेल्या बैठकीत अखेर वादावर तोडगा काढण्यात आला. कामगार संघटनाच्या मागणीनुसार प्रत्येक कामगाराचा २५ लाखांचा जीवनविमा आणि २ लाखांचा वैद्यकीय खर्च द्यायला निर्मात्यांनी होकार दिल्याने त्यांचे याबाबत समाधान झाले.