ETV Bharat / state

15 नायट्रोजन टॅंकरचे लवकरच होणार ऑक्सिजन टँकरमध्ये रुपांतर; एफडीएचा निर्णय - एफडीए ऑक्सिजन पुरवठा उपाययोजना

गेल्या काही दिवसात ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचे मृत्यू होत असल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर ऑक्सिजनच्या कमतरतेचा विषय ऐरणीवर आला. त्यामुळे एफडीएने उत्पादक कंपन्यांकडील 15 नायट्रोजन टँकरचे रुपांतर ऑक्सिजन टँकरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tanker
टॅंकर
author img

By

Published : Sep 19, 2020, 3:15 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असून ऑक्सिजनची गरज लागणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही वाढती गरज पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आणि अन्न व औषध प्रशासना(एफडीए)ने विशेष प्रयत्न करत ऑक्सिजनचा साठा वाढवला आहे. पण हा साठा रुग्णालयापर्यंत पोहचवण्यासाठी टँकर कमी पडत आहेत. त्यामुळे आता टँकरची संख्या वाढवण्यासाठी एफडीएने उत्पादक कंपन्यांकडील 15 नायट्रोजन टँकरचे रुपांतर ऑक्सिजन टँकरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू केली असून हे टँकर उपलब्ध झाल्यास मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा जलद व वेळेत करणे शक्य होईल, अशी माहिती एफडीएच्या औषध विभागाचे सहआयुक्त जुगल किशोर मंत्री यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

कोरोनाच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसापासून ऑक्सिजनच्या कमतरतेचा विषय ऐरणीवर आला आहे. लॉकडाऊन अगोदर 300 टन ऑक्सिजनची गरज राज्याला भासत होती. मात्र, कोरोना काळात ही गरज वाढून 880 टनापर्यंत गेली आहे. यातील 500 टन ऑक्सिजन कोरोना रुग्णांसाठी लागत आहे. कोरोना रुग्णांना लागणाऱ्या या 'प्राणवायू'ची कमतरता भासू नये यासाठी एफडीएने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता ऑक्सिजनचा पुरेसा साठा राज्याकडे आहे. मात्र, ऑक्सिजनचे 80 टक्के प्लँट हे मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात आहेत. यातही सर्वाधिक प्लँट रायगड जिल्ह्यात आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ऑक्सिजनचे वितरण करण्यात बराच वेळ लागत आहे. रायगड, मुंबईतून टँकर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भापर्यंत पोहचवण्यासाठी वेळ लागत आहे. रायगडवरून टँकर निघाल्यानंतर तो पुण्यात काही साठा वितरणकरून मग पुढे साताऱ्यात पोहचतो. तिथे काही साठा देऊन मग सांगलीला पोहचतो आणि टाकी रिकामी करून पुन्हा कंपनीसाठी रवाना होतो. टँकर कमी असल्याने अशी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे, असेही मंत्री यांनी सांगितले.

168 पैकी 120 ऑक्सिजन टँकर कार्यरत -

उत्पादकांकडून सध्याच्या घडीला राज्यात 168 ऑक्सिजन टँकर उपलब्ध आहेत. प्रत्यक्षात मात्र 120 टँकरद्वारेच राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता हे टँकर कमी पडत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन टँकरची संख्या वाढवण्यासाठी एफडीएने कंपन्यांना नायट्रोजन टँकरचे रुपांतर ऑक्सिजन टँकरमध्ये करण्यास सांगितले आहे. त्यादृष्टीने आता प्रयत्नही सुरू झाले असून 15 नायट्रोजन टँकरचे रूपांतर ऑक्सिजन टँकरमध्ये करण्यात येणार आहे.

पेसो(PESO) ची परवानगी आवश्यक -

कोणत्याही वायूची ने-आण, वितरण करणे ही प्रक्रिया मोठी आव्हानात्मक आणि जबाबदारीचे काम आहे. त्यातही प्रत्येक वायूसाठी विशिष्ट प्रकारचे टँकर असतात. त्यासाठी विशिष्ट रंग-खुणाही असतात आणि त्यासाठीची परवानगीही वेगवेगळी असते. त्यामुळे ज्या वायूवाहतूकीसाठी परवानगी मिळाली आहे त्या टँकरमधून तोच वायू वाहून नेणे बंधनकारक असते. आता टँकरची कमतरता असल्याने नायट्रोजनच्या टँकरचे रूपांतर ऑक्सिजनच्या टँकरमध्ये करण्यासाठी PESO अर्थात 'पेट्रोलियम अ‌ॅण्ड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन' यांची परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी घेणे अत्यंत अवघड असून यासाठी मोठा कालावधी लागतो. असे असले तरी महामारीच्या काळात लवकरात लवकर याला परवानगी देण्यात यावी यासाठी आपण PESO ला पत्र लिहिल्याचे जुगल मंत्री यांनी सांगितले. ही परवानगी मिळाल्यास 15 नायट्रोजन टँकरचे वॉल्व्ह, रंग-खुणा बदलू घेत त्यांचे ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतरीत करण्याचा एफडीएचा प्रयत्न आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.