ETV Bharat / state

'पोराला खांद्यावर घेऊन धावत सुटलो, प्रशासन मदतीला आले असते तर जीव वाचला असता' - horrifying incident

लोकांमधून काहीजण माझ्या मदतीला आले, पण कुठलीही सरकारी यंत्रणा आणि पोलीस मदतीला आले नाही.

जाहिद खानचे वडील
author img

By

Published : Mar 15, 2019, 3:54 PM IST

मुंबई- आम्ही कधीही रात्रीच्या वेळी या पुलावरून जात नव्हतो. परंतु, काल पैसे द्यायचे होते म्हणून बापलेक दोघेही निघालो होतो. तरीही मुलाने मला सांगितलं होते 'अब्बा गर्दी बहुत है ब्रिज के साईड से चलो', आणि काही क्षणातच पूल कोसळला. आम्ही दोघेही ब्रिजवरून खाली कोसळलो. लगेच मी जखमी अवस्थेत मुलाला पाठीवर घेतले आणि तसाच रुग्णालयाच्या दिशेने पळू लागलो. लोकांमधून काहीजण माझ्या मदतीला आले, पण कुठलीही सरकारी यंत्रणा आणि पोलीस मदतीला आले नाही, असे हिमालय पूल दुर्घटनेतील मृत जाहिद खान याचे वडील सिराज मुराद खान सांगत होते. ही घटना सांगत असताना त्यांना अश्रु अनावर होत होते.

घटनेबद्दल सांगताना जाहिदचे वडील

सीएसटी स्थानकाच्या जवळ असलेला पूल कोसळून जाहिद खान ठार झाला. परंतु, त्याचे वडील थोडक्यात बचावले अन् फक्त जखमी झाले. मी वाचलो परंतु माझा मुलगा वाचू शकला नाही. त्यामुळे आता माझे सगळे संपलेले आहे, असे सांगत त्यांना रडू आवरत नव्हते. घाटकोपर येथे असलेल्या दामोदर पार्कच्या सी-3 इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ते राहतात. सिराज यांना तीन मुले आहेत. त्यात सर्वात मोठा मुलगा जाहीद होता. तो मागील काही वर्षापासून किचेन, बेल्ट आणि छत्री विक्रीचा व्यवसाय करत होता.
दररोज सकाळच्या वेळात माजिद बंदर येथील मार्केटमध्ये जाऊन माल आणणे आणि व्यापाऱ्यांचे व्यवहार पूर्ण करणे, असे काम ते रोज सकाळी करून घेतात. मात्र, कालचा दिवस त्यांच्यासाठी घातवार ठरला. ते सकाळ ऐवजी सायंकाळी काम करण्यास निघाले मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. जाहीदचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. एक मुलगी सव्वा महिन्याची असून तिच्या नामकरणाचा विधीही पूर्ण झाला नाही. आता आमच्या कुटुंबातील सगळ्यात कमावता आणि हुशार मुलगा गेला आहे. काळाने आमच्या कुटुंबावर मोठा घाला घातला आहे. आता आमचा मुलगा गेला तर आमचे काही राहिले नाही, असे वडील सिराज खान सांगताना ढसाढसा रडत होते.

सरकारने आम्हाला आता कितीही मदत केली तरी आमचा मुलगा परत येणार नाही. मात्र, ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Intro:माझ्या पोराला खांद्यावर घेऊन मी दवाखान्याच्या दिशेने धावत सुटलो, पण मुलगा वाचला नाही

(बाईट मोजोवर वर पाठवले आहेत ते घ्यावेत)

मुंबई, ता. 15 :

आम्ही कधीही रात्रीला या ब्रिजवरून जात नव्हतो. परंतु काल पेमेंट द्यायचे म्हणून बापलेक दोघेही निघालो. तरीही मुलाने मला सांगितले होते 'अब्बा गर्दी बहुत है ब्रिज के साईड मे चलो', तो असे म्हणाला आणि काही क्षणातच ब्रिज कोसळला. आम्ही दोघेही ब्रिज वरून खाली कोसळलो. मुलगा आणि मीही पडलो. मला वाटले माझा पोरगा जिवंत आहे म्हणून मी त्याला पाठीवर घेतले आणि तसाच दवाखान्याच्या दिशेने पळू लागलो. लोकांमध्ये माझ्या मदतीला आले, पण कुठलीही सरकारी यंत्रणा आणि पोलीस मात्र मदतीला आले नव्हते. असे वडील सिराज मुराद खान भडाभडा रडू लागले.
सीएसटी स्थानकाच्या जवळ असलेला ब्रिज काल कोसळून जाहिद खान हा जागेवरच ठार झाला होता तर त्याचे वडील सिराज खान हे सुद्धा त्या ब्रीजवर कोसळत होते मात्र त्यांचा जीव वाचला. ते जखमी झाले आहेत.

मी वाचला परंतु माझा मुलगा वाचू शकला नाही त्यामुळे आता माझं सगळं संपलेला आहे असे सांगत त्यांना रडू आवरत नव्हते घाटकोपर येथे असलेल्या दामोदर पार्कच्या सी-3 इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतात. सिराज यांना तिनं मुले आहेत. त्यात सर्वात मोठा मुलगा होता.जाहीद खान मागील काही वर्षापासून किचेन बेल्ट आणि छत्रीच्या विक्रीचा व्यवसाय करतात.
दररोज सकाळच्या वेळात माजिद बंदर येथील मार्केटमध्ये जाऊन त्यासाठीच्या वस्तू आणणे आणि संबंधित व्यापाऱ्यांचे व्यवहार पूर्ण करणे असे काम ते रोज सकाळीच करून घेतात. मात्र कालचा दिवस त्यांच्यासाठी घातवार ठरला. ते सकाळ ऐवजी सायंकाळी बापलेक दोघे निघाले आणि त्यात बाप वाचला असला तरी मुलाचा मात्र जागेवरच मृत्यू झाला घाटकोपर परिसरात असलेल्या दामोदर पार्क मध्ये हे कुटुंब राहत असून जाहीद त्याला दोन मुले आहेत एक मुलगी सव्वा महिन्याची असून तिच्या नामकरणाचा विधीही तो पूर्ण करण्यास बाप राहू शकला नाही.आता आमच्या कुटुंबातील सगळ्यात कमावता आणि हुशार मुलगा होता म्हणून काळाने आमच्या कुटुंबावर खूप मोठा घाला घातला आहे आता आमचा मुलगा गेला तर आमचे काही राहिले नाही असे वडील साहिद खान ढसाढसा रडू लागले..
सरकारने आम्हाला आता मदत कितीही केली तरी आमचा मुलगा परत येणार नाही.मात्र ज्यामुळे ही घटना घडली त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.Body:माझ्या पोराला खांद्यावर घेऊन मी दवाखान्याच्या दिशेने धावत सुटलो, पण मुलगा वाचला नाहीConclusion:माझ्या पोराला खांद्यावर घेऊन मी दवाखान्याच्या दिशेने धावत सुटलो, पण मुलगा वाचला नाही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.